गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:42 IST

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती; UPI वरील शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान

यूपीआय व्यवहारांवर आता शुल्क आकारलं जाणार असल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती; UPI वरील शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

देशात महागाई आधीच वाढलेली असताना आता यूपीआय पेमेंटवरही शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI च्या FAQ नुसार हा नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. याचा अर्थ यूपीआय पेमेंट यापुढे मोफत राहणार नाही. Rs २,००० पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार आहे. एखाद्या सामान्य माणसाने पेट्रोल, वीज बिल किंवा Rs २,००० पेक्षा जास्त रकमेचं कोणतंही बिल यूपीआयने भरलं, तर प्रत्येक व्यवहारामागे त्याला Rs ५ शुल्क द्यावं लागणार आहे.

या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यूपीआय पेमेंटवर प्रस्तावित असलेला एमडीआर कर सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. सरकारने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्याचा आणि अमेरिकेला मोठा नफा कमावण्याची संधी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून Rs २,००० पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. मात्र हे शुल्क ग्राहकाला नाही, तर कंपनी किंवा दुकानाला भरावं लागणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच थेट सामान्य ग्राहकाच्या खिशातून हे पैसे कापले जाणार नसले, तरी दुकानदार किंवा कंपनीवर हा आर्थिक भार पडणार आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी म्हणजेच १६ सप्टेंबर २०२६ रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी यूपीआय करावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, इंदिराजींना एकदा विचारण्यात आलं होतं की त्यांचा कल डाव्या की उजव्या कोणत्या बाजूला जास्त आहे. त्यावर इंदिराजींनी उत्तर दिलं होतं की त्यांचा कोणत्याही बाजूकडे कल नाही, त्यांची विचारसरणी पूर्णपणे सरळ होती. या उदाहरणातून राहुल गांधी यांनी इंदिरा गांधींच्या धोरणांची तुलना सध्याच्या सरकारच्या भूमिकेशी केली.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, पण मोदीजींची संकल्पना वेगळी आहे. ते डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे नाहीत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. यूपीआय कर लादून आणि अमेरिकेला मोठी रक्कम देऊन त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकावर कर लादला आहे, असंही ते म्हणाले. मोदीजी, अमेरिकेपुढे झुकणं थांबवा, हिंमत दाखवा, उभे राहा आणि यूपीआय कर रद्द करा, असं आवाहनही राहुल गांधी यांनी या व्हिडिओतून केलं आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ