बुधवार, 16 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:41 IST

बोथलीत सरकारी रुग्णवाहिकेची तोडफोड, डॉक्टरांना धमकावल्याने तरुणावर गुन्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील बोथली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या सरकारी ॲम्ब्युलन्सवर दगडफेक करून सुमारे २४ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. मध्यस्थी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बोथलीत सरकारी रुग्णवाहिकेची तोडफोड, डॉक्टरांना धमकावल्याने तरुणावर गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील बोथली गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या सरकारी ॲम्ब्युलन्सवर दगडफेक करून तिची मोठी तोडफोड करण्यात आली. या प्रकारात मध्यस्थी करायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चक्रपानी ख्रिस्तन गणवीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावली पोलिसांनी गावातीलच एका तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वय ५७ असलेले डॉ. गणवीर एप्रिल २०२४ पासून बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात आणि आरोग्य केंद्राला लागून असलेल्या शासकीय निवासस्थानी राहतात. १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साधारण साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना बाहेरून काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून ते निवासस्थानातून बाहेर पडले आणि आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तिथे त्यांना एक इसम आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय ॲम्ब्युलन्सवर बेधडक दगडफेक करून काचा फोडताना दिसला.

डॉ. गणवीर यांनी त्या इसमाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थेट डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. "तू कोण मला अडवणारा" असे म्हणत त्याने डॉक्टरांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर डॉ. गणवीर यांनी गावातील ॲम्ब्युलन्स चालक प्रफुल अनिल इटकेलवार यांना तातडीने फोन करून आरोग्य केंद्रात बोलावून घेतले. चालक पोहोचेपर्यंत तोडफोड करणारा इसम काही अंतरावर निघून गेला होता, मात्र चालकाने त्याची ओळख पटवली. तो बोथली येथीलच राहणारा सुभाष रमेश अप्पलवार (वय अंदाजे ३४ वर्षे) असल्याचे चालकाने सांगितले.

घटनेनंतर वाहनाची पाहणी केली असता, दगडफेकीत ॲम्ब्युलन्सची समोरील मुख्य काच, दोन्ही हेडलाईट्स, दोन्ही बाजूंचे आरसे आणि डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फुटल्याचे निष्पन्न झाले. या तोडफोडीत सुमारे २४ हजार रुपयांचे शासकीय नुकसान झाले आहे.

शासकीय वाहनाचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी डॉ. चक्रपानी गणवीर यांनी सावली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सावली पोलिसांनी आरोपी सुभाष अप्पलवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३२४(३), ३२४(४), ३५१(२) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई केवल निंबाजी तुरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ