गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:01 IST

पुणे: बटण दाबताच नंबर प्लेट गायब; चालकावर आरटीओची कारवाई, ५१ ओव्हरस्पीडिंगच्या चलनांचा धक्कादायक खुलासा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पिंपरी-चिंचवड आरटीओने फॉर्च्युनर चालकाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, तपासात गाडीवर ५६ ई-चलने आणि एक लाख रुपयांहून अधिक थकीत दंड असल्याचे समोर आले आहे.

पुणे: बटण दाबताच नंबर प्लेट गायब; चालकावर आरटीओची कारवाई, ५१ ओव्हरस्पीडिंगच्या चलनांचा धक्कादायक खुलासा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने एका फॉर्च्युनर चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या चालकाने आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर बटण दाबताच खाली येणारा ऑटोमॅटिक काळा पडदा बसवून घेतला होता, ज्यामुळे बटण दाबल्यानंतर काही क्षणांतच नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात होती आणि ती कोणालाही वाचता येत नव्हती.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरू लागला. व्हिडिओत गाडीच्या आतमध्ये बसलेल्या चालकाने बटण दाबताच नंबर प्लेटवर पडदा खाली येताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी लगेच संबंधित गाडीचा शोध सुरू केला आणि ती नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याचा तपास हाती घेतला.

ताथवडे भागात राहणारे विजय दगडे हे या फॉर्च्युनरचे मालक असल्याचे तपासात समोर आले. हायवेवरील स्पीड कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठीच हे यंत्र बसवण्यात आले होते का, याची आरटीओकडून चौकशी सुरू आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर किंवा अतिवेगाने गाडी चालवल्यानंतर हायवेवरील कॅमेऱ्यांमध्ये गाडीचा नंबर आपोआप नोंदवला जातो आणि त्यावरून घरपोच ई-चलन पाठवले जाते. हे टाळण्यासाठीच नंबर प्लेट कॅमेऱ्याला दिसू नये अशी व्यवस्था केली गेली का, हा या तपासाचा मुख्य मुद्दा आहे.

तपासादरम्यान या फॉर्च्युनरवर आधीपासूनच मोठ्या संख्येने ई-चलने प्रलंबित असल्याचे उघड झाले. गाडीवर एकूण ५६ ई-चलने असून त्यापैकी तब्बल ५१ चलने ओव्हरस्पीडिंगची म्हणजे अतिवेगाने गाडी चालवल्याची आहेत, तर एक चलन नो-एंट्रीच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. या गाडीवर एक लाख रुपयांहून अधिक दंड थकीत असल्याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत यातील केवळ ४,५०० रुपयांचाच दंड वसूल झाला आहे, बाकीची मोठी रक्कम अद्याप भरलेली नाही.

नंबर प्लेट झाकण्यामागे हा केवळ एकदाच झालेला प्रकार आहे की याआधीही अशा पद्धतीने वाहतूक नियम मोडले गेले आहेत, याची चौकशी आरटीओकडून सुरू आहे. नंबर प्लेट जाणूनबुजून लपवण्यासाठी वाहनात असे यंत्र बसवणे हे वाहतूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले असून, यानंतर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी सांगितले की, या गाडीचा याआधी कोणत्या गुन्ह्यात वापर झाला आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. तसेच नंबर प्लेट लपवण्याचा हा प्रकार याआधीही घडला होता का, हेही तपासले जात आहे. व्हायरल व्हिडिओमुळे आरटीओला कारवाईची संधी मिळाली असली, तरी त्यातून या गाडीवरील थकीत चलनांचा मोठा इतिहासही समोर आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ