Ferrero Rocher चॉकलेट आता बारच्या रूपात, दोन हेझलनट व्हेरिएंट भारतात दाखल
फेरेरो इंडियाने प्रीमियम बार सेगमेंटमध्ये पाऊल टाकत हेझलनट बार्स लाँच केले, ९० ग्रॅम बारची किंमत ४९९ रुपये.
चॉकलेटप्रेमींसाठी एक नवीन पर्याय बाजारात आलाय. जागतिक फेरेरो ग्रुपचा भाग असलेल्या फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फेरेरो रोशर बार्सच्या लाँचची घोषणा केलीय. यामुळे ब्रँडने भारतातील प्रीमियम बार सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच एंट्री केलीय. आतापर्यंत ओळखीच्या असलेल्या फेरेरो रोशर चॉकलेटचा खास अनुभव आता या नवीन बार स्वरूपात मिळणार आहे. काळजीपूर्वक निवडलेले घटक, वेगळी चव आणि ब्रँडची ओळख असलेला सोनेरी लूक या बारमध्ये एकत्र आणण्यात आलाय. स्मूथ चॉकलेट, क्रीमी फिलिंग आणि कुरकुरीत हेझलनट्स हे फेरेरो रोशरचे सिग्नेचर मिश्रण या बारमध्येही कायम ठेवण्यात आलंय.
गुणवत्ता, कारागिरी आणि वेगवेगळ्या संवेदनांना स्पर्श करणारा अनुभव यांच्या जोरावर फेरेरो रोशरने आतापर्यंत आपली ओळख निर्माण केलीय. आता या नवीन बार स्वरूपाच्या माध्यमातून ब्रँड आपला हाच सिग्नेचर अनुभव आणखी वेगळ्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय. मग तो एकट्याने चॉकलेट खाण्याचा क्षण असो किंवा इतरांसोबत शेअर करायचा प्रसंग, दोन्ही वेळी हा बार उपयोगी पडेल असं कंपनीचं म्हणणं आहे.
या बारची रचनाही खास पद्धतीने करण्यात आलीय. बारवर फेरेरो रोशरचं डिझाइन कोरलेलं आहे, जे या चॉकलेटच्या ओळखीच्या टेक्सचरची झलक दाखवतं आणि स्मूथ व चवदार भागांसोबत बदलत जातं. निवडक कोको आणि हेझलनट्सपासून बनवलेला हा बार तोंडात विरघळतो आणि प्रत्येक घासागणिक वेगवेगळ्या पोताचा अनुभव देतो. क्लासिक हेझलनट आणि ७० टक्के कोको हेझलनट अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही रेंज उपलब्ध आहे. यातील ७० टक्के कोको हेझलनट व्हेरिएंट सर्वाधिक कोकोचा अनुभव देणारा आहे.
फेरेरो इंडिया सबकॉन्टिनंटचे मार्केटिंग हेड झोहेर कापुसवाला यांनी याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "फेरेरो रोशरने गुणवत्ता, कारागिरी आणि खास चव यांच्या जोरावर भारतात मजबूत स्थान निर्माण केलंय. फेरेरो रोशर बार्सच्या माध्यमातून आम्ही याच घटकांना नवं रूप देतोय आणि ग्राहकांना ब्रँडचा अनुभव घेण्यासाठी आणखी वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध करून देतोय. घटकांच्या निवडीपासून ते बारच्या डिझाइन आणि चवीपर्यंत प्रत्येक बारीक गोष्ट विचारपूर्वक ठरवण्यात आलीय, जेणेकरून प्रत्येक घास खास वाटावा. ब्रँडची मूळ ओळख कायम ठेवत आम्हाला ग्राहकांना या नव्या रूपातल्या फेरेरो रोशरचा अनुभव द्यायला खूप आनंद होतोय."
सिग्नेचर सोनेरी रॅपरमध्ये गुंडाळलेला प्रत्येक बार ९० ग्रॅमचा असून त्यावर ब्रँडची खास ओळख कायम आहे. यातील क्लासिक मिल्क व्हेरिएंट स्मूथ आणि आल्हाददायक अनुभव देतो, तर ७० टक्के डार्क व्हेरिएंट अधिक समृद्ध आणि गडद कोकोचा अनुभव देतो.
सुरुवातीला हे फेरेरो रोशर बार्स क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. त्यानंतर मोठ्या शहरांमधील मॉडर्न ट्रेड आणि प्रीमियम स्टोअर्समध्येही ते वितरित केले जातील. "फेरेरो रोशर आता बार स्वरूपात" या नावाने लाँच कॅम्पेन राबवलं जाणार असून ते ओओएच, डिजिटल आणि क्रिएटर कोलॅबोरेशनद्वारे प्रसारित होईल. या कॅम्पेनचा शेवट अभिनेता हृतिक रोशन यांचा समावेश असलेल्या जाहिरातीने होणार आहे. क्लासिक हेझलनट आणि ७० टक्के कोको हेझलनट या दोन्ही व्हेरिएंटमध्ये मिळणाऱ्या ९० ग्रॅम बारची एमआरपी ४९९ रुपये असणार आहे.