गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:59 IST

मुंबई लोकल: आता कुटुंबासाठीही रेलवन ॲपवरून पास काढता येणार

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीने 2 सप्टेंबरपासून रेलवन ॲपवर शेअर करता येणारी सीझन तिकीट सुविधा सुरू, सोबतच कडक नियमावलीही जाहीर

मुंबई लोकल: आता कुटुंबासाठीही रेलवन ॲपवरून पास काढता येणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईत लोकलने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट काढण्याची पद्धत रेल्वेने आणखी सोपी आणि डिजिटल केली आहे. केंद्र सरकारच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर 2 सप्टेंबरपासून रेलवन ॲपवर शेअर करता येण्याजोगी सीझन तिकीट म्हणजेच पास काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशाला आता फक्त स्वतःसाठीच नाही, तर कुटुंबातील सदस्य किंवा इतर पाच जणांसाठीही एकाच ॲपवरून पास काढता येणार आहे. मात्र प्रवासादरम्यान कुणाला अडचण येऊ नये यासाठी रेल्वेने त्यासोबत काही कडक नियमही जाहीर केले आहेत.

नव्या नियमांनुसार रेलवन ॲपवरून काढलेला पास पीडीएफ स्वरूपात मोबाईलवर किंवा छापील कागदावर सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. पण या पासवर संबंधित प्रवाशाचा स्पष्ट फोटो आणि स्कॅन करता येईल असा क्यूआर कोड असणे गरजेचे आहे. फक्त ॲपवरचे चलन, बुकिंगची पावती किंवा जुन्या पद्धतीच्या यूटीएस कागदी पासची प्रत प्रवासासाठी ग्राह्य धरली जाणार नाही, हे प्रवाशांनी लक्षात ठेवायला हवं.

वयोमर्यादेबाबतही स्पष्ट नियम आहेत. स्वतःसाठी पास काढणाऱ्या प्रवाशाचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे, तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी म्हणजेच लाभार्थ्यांसाठी किमान वयोमर्यादा 5 वर्षे ठेवण्यात आली आहे. स्वतःसाठी काढलेला पास जिओ-फेंसिंग पडताळणीनंतर बुकिंगच्या दिवसापासूनच लागू होतो. मात्र इतरांसाठी काढलेल्या पासची वैधता बुकिंगच्या पुढच्या दिवसापासून सुरू होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे भागात सध्या लागू असलेल्या बहु-तिकीट धोरणाच्या सवलती पुढेही तशाच सुरू राहणार आहेत.

तिकीट तपासणी अधिक कडक व्हावी यासाठी रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचारी, स्टेशनवरील स्टाफ आणि स्क्वॉड पथकांना हँडहेल्ड टर्मिनल म्हणजेच एचएचटी उपकरणांचे अद्ययावत तंत्रज्ञान दिले आहे. प्रवासादरम्यान तिकीट तपासनीस आधी प्रवाशाच्या चेहऱ्यावरून प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि गरज वाटल्यास उपकरणाने क्यूआर कोड स्कॅन करून खात्री करतील.

प्रवाशांनी यात विशेष काळजी घ्यायला हवी. पासवरचा क्यूआर कोड अस्पष्ट असेल, फाटलेला असेल, त्यात छेडछाड झालेली असेल किंवा कोणत्याही कारणाने तो वाचता येत नसेल, तर पासची सत्यता सिद्ध करता येणार नाही. अशा वेळी संबंधित प्रवाशाला वैध तिकीट नसलेल्या प्रवाशाच्या श्रेणीत धरून रेल्वेच्या नियमांनुसार दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवास करताना डिजिटल किंवा छापील पासची प्रत अगदी स्पष्ट आणि सुस्थितीत ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ