गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:19 IST

मारबत महोत्सवात घडले नागपूरच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते जॉकी श्रॉफ यांच्यासह विदेशी पाहुण्यांचीही मारबत महोत्सवाला उपस्थिती

मारबत महोत्सवात घडले नागपूरच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नागपूर शहराच्या १४५ वर्षे जुन्या मारबत-बडग्या मिरवणुकीच्या परंपरेला यंदा एक वेगळेच रूप मिळाले. ही नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने पुढाकार घेत यावर्षी पहिल्यांदाच मारबत महोत्सवाचे आयोजन केले. ११ तारखेला झालेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून उपस्थित विशाल जनसमुदायाचा उत्साह आणखी वाढवला.

मुख्यमंत्र्यांसोबतच प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते अंकूश चौधरी आणि क्रिकेटपटू उमेश यादव हेही या महोत्सवात सहभागी झाले. विशेष म्हणजे काही देशांच्या वाणिज्य राजदूतांनीही महोत्सवाला भेट देत नागपूरची ही खास परंपरा जवळून पाहिली आणि प्रत्यक्ष जाणून घेतली.

मान्यवरांना मारबत आणि विविध विषयांवर आधारित बडग्यांची मिरवणूक नीट पाहता यावी, यासाठी सेंट्रल अॅव्हेन्यूवरील गांधी पुतळा चौकात एक भव्य मंच उभारण्यात आला होता. या मंचावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके आणि डॉ. राजीव पोतदार उपस्थित होते. त्यांच्यासोबतच महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड आणि फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रीक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका निगलगार्ड, फिनलँडच्या वाणिज्यदूत पेट्रा थीमन यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.

महोत्सवाला आलेल्या विदेशी पाहुण्यांनी या परंपरेमागचा इतिहास आणि माहितीही जाणून घेतली. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता नरेंद्र बोरकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि माजी महापौर अर्चना डेहनकर यांनीही महोत्सवात हजेरी लावली. यासोबतच साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि ग्राफिक डिझायनर विवेक रानडे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

महापालिकेने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूरच्या या परंपरेला जागतिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, अशी इच्छाही व्यक्त केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ