गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:01 IST

गडचिरोलीत वर्षभरापूर्वी समाधी बांधलेली महिला जिवंत परतली, कुटुंब सुखावले

एटापल्ली तालुक्यातील मोहरली येथील महिला वर्षभर बेपत्ता होती, नांदेडच्या निवारागृहात तिचा शोध लागला

गडचिरोलीत वर्षभरापूर्वी समाधी बांधलेली महिला जिवंत परतली, कुटुंब सुखावले
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागडजवळील मोहरली गावात राहणाऱ्या मुक्का दस्सू कांदो (वय ६०) या वर्षभरापूर्वी अचानक घर सोडून निघून गेल्या होत्या. त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी छत्तीसगडसह अनेक ठिकाणी प्रयत्न केले, नातेवाईकांकडेही चौकशी केली, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्या आता या जगात नसाव्यात असे गृहीत धरून कुटुंबीयांनी त्यांच्या स्मरणार्थ समाधी बांधली होती. मात्र वर्षभरानंतर त्या जिवंत असल्याचे समोर आल्याने कुटुंबीयांना अनपेक्षित आनंद मिळाला.

भटकंतीच्या अवस्थेत असताना त्यांना नांदेड येथील डोमाजी आधार फाऊंडेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज निवारागृहाचा आधार मिळाला होता. निवारागृहात त्यांच्या जेवणाची आणि आरोग्याची काळजी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले, तसेच नागपूर येथील मनोरुग्ण रुग्णालयात तपासणी आणि उपचारही करण्यात आले. या रेस्क्यूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता, जो मोहुरलीतील स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडला. चेहरा ओळखताच कुटुंबीयांना त्या मुक्काच असल्याची शंका आली. पुढे चौकशी आणि खात्री केल्यानंतर वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या कांदो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.

ही बातमी समजताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यानंतर निवारागृहातील परमेश्वर मळावी, रजनी कुंभारे, मनीष खोब्रागडे, आशिष खोब्रागडे, आदित्य उईके आणि समृद्ध खोब्रागडे यांनी त्यांना गाडीतून मोहुरली येथे घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली. जवळपास पाच तासांचा प्रवास करून त्यांना सुखरूपपणे कुटुंबीयांकडे पोहोचवण्यात आले.

घराच्या उंबरठ्यावर मुक्का कांदो यांना पाहताच त्यांचे पती, मुलगा आणि मुलगी यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वर्षभरापूर्वी ज्यांच्या मृत्यूचे दुःख उराशी बाळगून समाधी बांधली होती, तीच व्यक्ती आज त्यांच्यासमोर उभी होती. कुटुंबीयांनी त्यांना जवळ घेतले आणि वर्षभराचा विरह त्या मिठीत विरघळून गेला. एका बाजूला समाधीवरच्या आठवणी, तर दुसऱ्या बाजूला घराच्या उंबरठ्यावर परतलेली जिवंत व्यक्ती, असे भावुक चित्र यावेळी पाहायला मिळाले.

या घटनेने केवळ एका कुटुंबाला त्यांची व्यक्ती परत मिळाली असे नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज निवारागृहाने दिलेला आधार, तेथील माणुसकीची सेवा आणि सोशल मीडियामुळे मिळालेली एक छोटीशी ओळख किती मोठे नाते पुन्हा जोडू शकते, याचा प्रत्यय आला.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला भटकंतीच्या अवस्थेत असलेल्या मुक्का कांदो नांदेड (ता. नागभीड) येथील डोमाजी आधार फाऊंडेशनच्या पथकाला आढळल्या होत्या. पथकाने त्यांना नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रमात दाखल केले. त्यानंतर आश्रमाकडून रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. हा व्हिडिओ दस्सो यांच्या भाच्याने पाहिला आणि वर्षभरापासून हरवलेली आई जिवंत असल्याची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. अशा प्रकारे एका क्षणात घरातील निराशेचे वातावरण आनंदात बदलले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ