वर्धा शहर पोलिसांकडून पोळा, गणेश स्थापनेपूर्वी 53 गुन्हेगार, दारूविक्रेत्यांना प्रवेशबंदी
पोळा, तान्हा पोळा आणि गणेश स्थापना शांततेत पार पडावी यासाठी वर्धा शहर पोलीस ठाण्याने हद्दीतील रेकॉर्डवरील 53 गुन्हेगार व दारूविक्रेत्यांची नावे जाहीर करून त्यांना शहर हद्दीत प्रवेशबंदी केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पोळा, तान्हा पोळा तसेच आगामी गणेश स्थापना कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस ठाणे वर्धा शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि दारूविक्रेते यांची नावे जाहीर केली असून त्यांना शहर हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा एकूण 53 जणांवर ही कारवाई करण्यात आली.
प्रवेशबंदी केलेल्या व्यक्तींमध्ये पुढील नावांचा समावेश आहे : 1. चंदन उर्फ आकाश रामचंद्र येंडाळे (वय 30, रा. स्टेशनफैल, वर्धा), 2. गोविंदा फकिरदास जाधव (वय 32, रा. आर्विनाका, वर्धा), 3. रामु किसन सातपुते (वय 30, रा. आर्विनाका, वर्धा), 4. दिगांबर रघुनाथ जाधव (वय 41, रा. आर्विनाका, वर्धा), 5. काळुराम उर्फ कार्तिक रामप्रसाद मुळे (वय 36, रा. आर्विनाका, वर्धा), 6. किशोर पळसराम कुहीकर (वय 44, रा. नागसेननगर, वर्धा), 7. सुभाष रामदास पाल (वय 47, रा. भिमनगर, वर्धा), 8. रंजित उपेंन्द्रसिंग थुरवाल (वय 24, रा. बोरगाव मेघे, वर्धा), 9. शुभम सदानंद काळे (वय 26, रा. पुलफैल, वर्धा), 10. अनिस मुकिंदराव डोंगरे (वय 28, रा. स्टेशनफैल, वर्धा), 11. विनोद सुंदरलाल जयस्वाल (वय 45, रा. गॉन्डप्लॉट, वर्धा), 12. राकेश मुन्ना पांडे (वय 33, रा. इतवारा बाजार, वर्धा), 13. विकास सुरज पांडे (वय 28, रा. ईतवारा बाजार, वर्धा), 14. चेतन राजु शिलेदार (वय 29, रा. सुदर्शननगर, वर्धा), 15. लता तुळशिराम जाधव (वय 30, रा. वडर झोपडपट्टी, आर्विनाका, वर्धा), 16. रवि बापुराव कावळे (वय 49, रा. मालगुजारीपुरा, वर्धा), 17. किशोर मुरलीधर सोनी (वय 35, रा. दयालनगर, वर्धा), 18. दिनेश मुन्ना पांडे (वय 31, रा. ईतवारा बाजार, वर्धा), 19. सैय्यद अख्तर खान उर्फ बबलु मुश्ताक अली (वय 46, रा. तारफैल, वर्धा), 20. पंकज प्रमोद मुन (वय 35, रा. सिध्दार्थनगर, वर्धा), 21. अतित भगवानदास जाट (वय 42, रा. इतवारा, वर्धा), 22. रामा उर्फ रामेश्वर गजानन आडे (वय 42, रा. बुरड मोहल्ला, इतवारा, वर्धा), 23. अमोल महेंन्द्र शंभरकर (वय 25, रा. तारफैल, वर्धा), 24. दिलीप उर्फ साई जयराम पंजवानी (वय 46, रा. इतवारा, वर्धा), 25. संजित रामकरण गौतम (वय 45, रा. आनंदनगर, वर्धा), 26. संतोष रामकरण गौतम (वय 40, रा. आनंदनगर, वर्धा), 27. हर्षल मनोज खेडकर (वय 22, रा. स्टेशनफैल, वर्धा), 28. चंदन उर्फ आकाश चंदन येंडाळे (वय 39, रा. स्टेशनफैल, वर्धा), 29. अजींक्य उर्फ अजु सुरेश बोरकर (वय 28, रा. नालवाडी, वर्धा), 30. गणेश शामरावजी पेंदोर (वय 39, रा. ईतवारा बाजार, वर्धा), 31. गौरव गजानन विरखेडे (वय 28, रा. बोरगाव मेघे, वर्धा), 32. नितीन बाबाराव ओरके (वय 33, रा. शास्त्रीचौक, वर्धा), 33. अमीत अरुन नाकाडे (वय 25, रा. पुलफैल, वर्धा), 34. आकाश प्रकाश गिरी (वय 32, रा. सुदामपुरी, वर्धा), 35. अरशद रउफ खान (वय 25, रा. महादेवपुरा, वर्धा), 36. कार्तिक उर्फ काळुराम रामप्रसाद मुळे (वय 32, रा. आर्विनाका, वर्धा), 37. अनिस मुकुंद डोंगरे (वय 30, रा. स्टेशनफैल, वर्धा), 38. छबुबाई दत्तुजी मिश्रा (वय 50, रा. बारेगाव मेघे, वर्धा), 39. छाया मुकुंद डोंगरे (वय 53, रा. स्टेशनफैल, वर्धा), 40. जय कैलास नासरे (वय 27, रा. स्टेशनफैल, वर्धा), 41. बादल रवि गणविर (वय 29, रा. स्नेहलनगर, वर्धा), 42. गौरव राजेश यादव (वय 22, रा. भिमनगर, वर्धा), 43. कम्मो उर्फ कमल खलील खॉ पठाण (वय 55, रा. गोंन्डप्लॉट, वर्धा), 44. गिता अशोक कोरे (वय 52, रा. वडर झोपडपट्टी, आर्विनाका, वर्धा), 45. जयश्री दिनेश जवादे (वय 44, रा. भिमनगर, वर्धा), 46. पुजा कार्तीक मुळे (वय 30, रा. वडर झोपडपट्टी, आर्विनाका, वर्धा), 47. रुखसाना जावेद बेग (वय 40, रा. आनंदनगर, वर्धा), 48. लता तुळशिराम जाधव (वय 30, रा. वडर झोपडपट्टी, आर्विनाका, वर्धा), 49. शारदा महेश जैस्वाल (वय 45, रा. स्टेशनफैल, वर्धा), 50. रवि गणेशलाल साहु (वय 42, रा. महादेवपुरा, वर्धा), 51. वंदना अजय मसराम (वय 45, रा. नागसेननगर, वर्धा), 52. विनोद दत्तुजी मिश्रा (वय 32, रा. बोरगाव मेघे, वर्धा), 53. समिर खॉ अबु बकर खॉ पठाण (वय 44, रा. स्टेशनफैल, वर्धा).
या 53 जणांना पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे पोळा आणि तान्हा पोळा हे सण कोणतीही अनुचित घटना न घडता शांततेत पार पडले. आगामी गणेश स्थापना देखील शांततेत पार पडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड तसेच पोलीस हवालदार हाडके, बन्सोड, पाटील आणि वंजारी यांच्या डीबी पथकाने केली.