गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

Maratha Reservation Protest: 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक वळण घेतले, तहसीलदारांची खुर्ची जाळल्याच्या आरोपावरून चार आंदोलक ताब्यात.

Maratha Reservation Protest: 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे बुधवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक वळण घेतले. उमरगा तहसील कार्यालयात शिरलेल्या चार आंदोलकांनी तहसीलदारांच्या केबिनमधील खुर्ची बाहेर काढून तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे काही कार्यकर्ते उमरगा तहसील कार्यालयात पोहोचले. त्या वेळी कार्यालयातील शिपाई साफसफाईच्या कामात गुंतले होते, त्यामुळे सुरुवातीला आंदोलकांकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. आंदोलक आत शिरत असल्याचे लक्षात येताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी दाद न देता तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तहसीलदार बसत असलेली खुर्ची केबिनमधून बाहेर काढून तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंड्याच्या कट्ट्याजवळ आणण्यात आली आणि तिच्यावर पेट्रोल ओतून ती पेटवण्यात आली, असा आरोप आहे.

या घटनेत अण्णासाहेब गोविंदराव पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार (तिघेही नाईचाकूर येथील रहिवासी) आणि वैजिनाथ आबा काळे (रहिवासी माडज, तालुका उमरगा) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गोविंद येरमे यांनी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. निरोप मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आंदोलकांना पोलीस वाहनात बसण्यास सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत पायीच नेले. तहसील कार्यालयापासून पोलीस स्टेशनपर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. 'मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे', 'देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' आणि 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत आंदोलक पोलीस स्टेशनवर पोहोचले.

तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश करताना आंदोलकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिपायाला धक्काबुक्की करून जबरदस्तीने आत प्रवेश केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी पोलीस स्टेशनवर पोहोचले. तहसीलदार गोविंद येरमे हेदेखील स्वतः पोलीस स्टेशनवर जाऊन पोलीस निरीक्षकांशी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली.

घटनेनंतर तहसीलदार गोविंद येरमे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, खात्री नसलेले मेसेज किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत आणि वस्तुस्थिती समजून घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ