गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:47 IST

दुष्काळी भागांचे तातडीने सर्वेक्षण, नियमानुसार भरपाई देणार: पालकमंत्री बावनकुळे

राज्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झालेल्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दुष्काळी भागांचे तातडीने सर्वेक्षण, नियमानुसार भरपाई देणार: पालकमंत्री बावनकुळे
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यातील ज्या भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे तीनही विभाग एकत्रितपणे हे सर्वेक्षण करणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत प्रशासन व मुख्य सचिवांना स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पावसाअभावी पिके करपली आहेत, त्या भागांचे सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर नियमांनुसार निश्चित मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमरावतीतील रुग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी शासनाने नियुक्त केलेल्या दहा सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. घटनेच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात असे निष्पाप जीव जाऊ नयेत यासाठी समितीच्या शिफारशींची राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. विशेषतः नवजात बालकांसाठीची केंद्रे आणि तेथील यंत्रणा अधिक आधुनिक व सक्षम करण्यासाठी शासन योजना आखत असल्याचे त्यांनी सांगितले.

हायकोर्टाने केलेल्या विचारणेबाबत बावनकुळे म्हणाले की, न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलीस देतील. पोलिसांनी सर्व बाबींची चौकशी करून अहवाल तयार केला असून, हायकोर्टाच्या निरीक्षणानुसार पोलीस आपली बाजू मांडतील. या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे झाली असून, दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबतही सरकार विचार करत आहे. सरकारी जमिनीबाबतही शासन गंभीर असून, यापुढे सरकारी जमीन कोणाच्याही घशात जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे ते म्हणाले.

मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र वाटप शिबिरांबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, यापूर्वीही अशी शिबिरे घेण्यात आली असून, उपलब्ध नियमावलीनुसार शिबिरे घेऊन प्रमाणपत्रांचे वितरण करणे हे शासनाचे धोरणच आहे. ओबीसी महासंघाच्या मागणीबाबत त्यांनी सांगितले की, ही मागणी अद्याप त्यांच्याकडे आलेली नसून, मागणी आल्यानंतर ती ओबीसी समितीसमोर ठेवली जाईल.

शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग तयार करताना केवळ वरचा थर टाकून काम होत नाही, तर माती, मुरूम आणि इतर सर्व आवश्यक कामे खालपासून करावी लागतात. प्रत्येक रस्त्याचे स्टँडर्ड व स्वरूप वेगळे असल्याने त्याचे रेट आणि अंदाजपत्रकही वेगळे असते. हे रोहित पवार यांना माहीत असूनही समाजात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाचा आणि जनतेचा पैसा वाया जाणार नाही याची काळजी घेत अंदाजपत्रक व सादरीकरण तयार केले असून, या प्रकल्पात भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजस्थानमधील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिलेले बावनकुळे म्हणाले की, दहाही महानगरपालिकांमध्ये विजय मिळेल असा विश्वास आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत मिळालेल्या यशापेक्षा मोठा विजय १४ तारखेला पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ