गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

मतदार यादीत नाव तपासा, विभागीय आयुक्त बिदरी यांचे आवाहन

चंद्रपुरात प्रारूप मतदार यादीची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची पहिली भेट, अंतिम यादी 4 नोव्हेंबरला

मतदार यादीत नाव तपासा, विभागीय आयुक्त बिदरी यांचे आवाहन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 राबवला जात आहे. यामध्ये प्रारुप मतदार यादीवर आलेले दावे आणि हरकती निकाली काढण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज, 10 तारखेला चंद्रपुरात पहिली भेट दिली.

जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून मतदारांनी त्यात आपले नाव आताच तपासून घ्यावे, असे आवाहन बिदरी यांनी केले. अंतिम यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राजकीय पक्षांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार केली जाईल, असे सांगत बिदरी म्हणाल्या की, 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या काळात नव्याने नाव नोंदवणे किंवा यादीत काही दुरुस्ती करायची असल्यास ती तपासून घ्यावी. ज्यांच्या नावात विसंगती आहे किंवा ज्यांचे मॅपिंग झालेले नाही, अशांना नोटीस गेल्यानंतर त्यांनी बीएलओ किंवा बीएलए यांच्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीला हजर राहून पूर्तता करावी. कोणताही पात्र मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

प्रारुप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये, मतदान बूथ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनाही या याद्या देण्यात आल्या आहेत. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांचे नाव तपासण्यासाठी तसेच वस्ती, तांडा, पाडे अशा ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे सांगण्यात आले. नागरिकांनी यादीत आपले नाव तपासून घ्यावे. नाव समाविष्ट नसल्यास किंवा 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असल्यास फॉर्म 6 भरावा, नाव वगळायचे असेल किंवा काही हरकत असेल तर फॉर्म 7 भरावा आणि एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या बूथवर असल्यास किंवा वय, नाव, पत्ता यामध्ये बदल करायचा असल्यास फॉर्म 8 भरून द्यावा. सर्व फॉर्म भरण्याची मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.

सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नाही. विशेष सखोल पुनरीक्षण-2026 च्या पहिल्या टप्प्यात मतदार सर्वसाधारण रहिवासी असल्याची पडताळणी करण्यावर मुख्य भर देण्यात आला होता. त्यामुळे अर्जात दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात न राहणाऱ्या लोकांचा समावेश या प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. सध्याच्या टप्प्यात जे मतदार अर्जातील पत्त्यावर हजर नाहीत किंवा दुसरीकडे राहायला गेले आहेत, पण राज्याच्या हद्दीतच राहत आहेत, असे मतदार आता त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणच्या यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात. मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत आणि 1 ऑक्टोबर 2024 नंतर 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नोंदणी सुरू आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यादरम्यान दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्याने किंवा अन्य कारणांमुळे ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली नाहीत, तेदेखील आता नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा सध्याचा टप्पा नवीन नावे नोंदवून घेण्यावरच केंद्रित आहे, जेणेकरून एकही पात्र नागरिक मतदार यादीतून सुटणार नाही. ही संपूर्ण मोहीम नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होईल. त्यामुळे सध्याच्या यादीची तुलना आधीच्या आकडेवारीशी करणे योग्य ठरणार नाही, कोणतीही तुलना किंवा मूल्यमापन करण्यापूर्वी अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ