गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:20 IST

नेहरू पुतळा चौकात मारबत महोत्सवात भजनसंध्या, किशन भगत यांच्या गायनाला रसिकांची दाद

नागपूर महानगरपालिका आणि श्री काली मारबत उत्सव समितीच्या वतीने नेहरू पुतळा, मस्कासाथ परिसरात भजनसंध्या कार्यक्रम पार पडला, यात महापौर निता ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नेहरू पुतळा चौकात मारबत महोत्सवात भजनसंध्या, किशन भगत यांच्या गायनाला रसिकांची दाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर शहरात सध्या मारबत महोत्सवाचे वातावरण भरून राहिले आहे. या पारंपरिक व ऐतिहासिक महोत्सवाचा एक भाग म्हणून मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी नेहरू पुतळा चौक आणि मस्कासाथ परिसरात भजनसंध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागपूर महानगरपालिका आणि श्री काली मारबत उत्सव समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या भजनसंध्येत सुप्रसिद्ध गायक किशन भगत यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. गणपती बाप्पाच्या आराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी किशन भगत यांनी 'बाबा गणपती की आई फौज' आणि 'मोहे अंगना गजानन आयो रे' ही भक्तिगीते सादर केली. त्यानंतर 'बस इतनी कृपा करना, मेरा वक्त सुधार जाए', 'मैं भोले का दीवाना' आणि 'मुझको बस महाकाल बाबा चाहिए' या भावपूर्ण रचना सादर झाल्या. या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि सर्वजण भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमाला महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अ.प.) गटनेत्या तथा काली मारबत उत्सव समितीच्या संयोजिका आभा पांडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेवक संतोष (रामभाऊ) आंबुलकर, नगरसेवक तुषार लारोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर आणि काळी मारबत उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव हारडे उपस्थित होते. याशिवाय समितीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिकही या कार्यक्रमाला हजर होते.

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी मारबत महोत्सवाच्या यंदाच्या विस्तारित स्वरूपाबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या की, नागपूरच्या जुन्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर पोहोचावा, हाच या महोत्सवामागचा मूळ हेतू आहे. पूर्वी हा मारबत उत्सव फक्त एका दिवसापुरता साजरा व्हायचा, मात्र यंदा मनपाकडून सलग चार-पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. महोत्सवाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचेही त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान काळी मारबत उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव हारडे आणि समितीच्या सर्व सदस्यांचा महानगरपालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. नागपूरच्या समृद्ध संस्कृतीचे जतन करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत महापौर निता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ