गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:27 IST

महावितरणमध्ये चार कार्यकारी संचालकांची नियुक्ती, कावळे, पाटील, मिश्रा, काकडे यांनी स्वीकारला कार्यभार

प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा आणि सुनील काकडे यांनी महावितरणच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला.

महावितरणमध्ये चार कार्यकारी संचालकांची नियुक्ती, कावळे, पाटील, मिश्रा, काकडे यांनी स्वीकारला कार्यभार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महावितरणच्या प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालकपदासाठी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून चौघांची निवड झाली असून, अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा आणि सुनील काकडे यांनी नुकताच आपापला कार्यभार स्वीकारला. या चारही अधिकाऱ्यांनी नियुक्तीपूर्वी महावितरणमध्ये मुख्य अभियंता या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी काम केले होते.

कार्यकारी संचालक अंकुर कावळे हे याआधी महावितरणच्या मुख्यालयात मुख्य अभियंता (वितरण) या पदावर कार्यरत होते. त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविकाही मिळवली आहे. सन 1997 मध्ये सहायक अभियंता म्हणून तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कावळे रुजू झाले होते. पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर येथे विविध पदांची जबाबदारी सांभाळली. सन 2025 पासून ते मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता म्हणून काम पाहत होते.

कार्यकारी संचालक संदीप पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतली असून सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहायक अभियंता म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. सन 2009 मध्ये थेट भरतीतून त्यांची कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. पुढे सन 2018 मध्ये त्यांना अधीक्षक अभियंतापदी तर सन 2025 मध्ये मुख्य अभियंतापदी बढती मिळाली. या नियुक्तीपूर्वी पाटील हे मुख्यालयात मुख्य अभियंता (वीज खरेदी) म्हणून कार्यरत होते.

कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहायक अभियंता म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर पदोन्नतींनुसार अलिबाग, वाशी, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे त्यांनी जबाबदारी सांभाळली. सन 2009 मध्ये थेट भरतीतून त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली, सन 2018 मध्ये अधीक्षक अभियंतापदी तर सन 2024 मध्ये मुख्य अभियंतापदी त्यांना बढती मिळाली. या नियुक्तीआधी मिश्रा हे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

कार्यकारी संचालक सुनील काकडे यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतली असून 1997 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहायक अभियंता म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर विविध पदांवर काम करताना त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अहिल्यानगर आणि भांडूप येथे जबाबदारी सांभाळली. सन 2022 मध्ये काकडे यांना मुख्य अभियंतापदी बढती मिळाली. भांडूप परिमंडलानंतर सन 2025 पासून ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ