Pehla Pyaar Doosri Baar चा फर्स्ट लूक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून सहा नवीन कलाकार करणार डेब्यू
फ्रेंडशिप-कॉमेडी जॉनरमधला हा सिनेमा २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातल्या थिएटरमध्ये झळकणार आहे.
नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी ओळखले जाणारे निर्माते लव रंजन पुन्हा एकदा सहा नव्या चेहऱ्यांना घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या आगामी 'पहला प्यार दूसरी बार' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. फ्रेंडशिप-कॉमेडी जॉनरमधला हा सिनेमा २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातल्या थिएटरमध्ये झळकणार आहे.
या चित्रपटातून अलीशा चोप्रा, स्पर्श वालिया, साक्षी वैद्य, कुणाल वैद्य, सरगुन कौर लूथरा आणि तुषार छिब्बर हे सहा नवीन कलाकार पडद्यावर लाँच होणार आहेत. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये हे सगळे कलाकार एकत्र दिसत असून त्यांच्या फ्रेश आणि स्टायलिश लूकमुळे पोस्टर लक्ष वेधून घेतंय.
पोस्टरमधून उत्साह, मैत्री आणि मस्तीची झलक दिसते. रंगीबेरंगी आणि मॉडर्न पद्धतीच्या ट्रीटमेंटमुळे पोस्टरला वेगळाच लुक मिळाला आहे. एकाच पोस्टरमधून सहाही नवीन कलाकारांना सादर केल्यामुळे चित्रपटाची स्टोरी आणि या कलाकारांच्या भूमिका नेमक्या कशा असतील, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
नवीन कलाकारांना लाँच करण्यामागचं कारण सांगताना लव रंजन म्हणाले, "न्यूकमर्सना लाँच करणे हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे, पण हे असे आव्हान आहे ज्याची मला खरोखरच प्रतीक्षा असते." याचा अर्थ नवीन आणि अनोळखी कलाकारांना पहिल्यांदा पडद्यावर आणणे हे कायमच कठीण काम राहिले असले, तरी अशा प्रकारच्या आव्हानाची लव रंजन यांना नेहमी आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "आजपासून पंधरा वर्षांपूर्वी 'प्यार का पंचनामा'च्या माध्यमातून मला ही संधी मिळाली होती आणि 'पहला प्यार दूसरी बार'च्या माध्यमातून पुन्हा एकदा अशीच संधी माझ्यासमोर आली, तेव्हा मला माहित होते की ही संधी मला सोडायची नाही." म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती, त्याच पद्धतीची संधी आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर चालून आली आहे.
सहा नवीन कलाकारांसाठी वेगळं विश्व उभं करण्याचा अनुभवही लव रंजन यांनी शेअर केला. "एक लेखक म्हणून सहा नव्या चेहऱ्यांसाठी एक जग निर्माण करणे आणि त्यांना त्या जगात स्वतःची रिदम शोधताना पाहणे, मला खूप आवडले," असं ते म्हणाले. यातून हे स्पष्ट होते की, या सहा नवोदित कलाकारांसाठी स्वतंत्र असे जग निर्माण करणे आणि त्या जगात त्यांना स्वतःची लय सापडताना पाहणे, हा अनुभव लव रंजन यांच्यासाठी विशेष समाधान देणारा ठरला.
'पहला प्यार दूसरी बार'चं दिग्दर्शन अनुज सैनी करत असून हे त्यांचं दिग्दर्शक म्हणून पहिलंच काम आहे. लव फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात असून लव रंजन आणि अंकुर गर्ग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. नात्यांवर आधारित मनोरंजक चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लव फिल्म्सकडून आता सहा नव्या कलाकारांना घेऊन येणाऱ्या या फ्रेंडशिप-कॉमेडी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.