Jio Canva Offer : जिओ ग्राहकांना मोठा फायदा, 4,000 रुपयांपर्यंतचा Canva Pro मिळणार मोफत
रिलायन्स जिओ आणि डिझाईन प्लॅटफॉर्म कॅनव्हा यांनी एकत्र येत जिओ ग्राहकांसाठी एक वर्षासाठी खास ऑफर जाहीर केली आहे.
रिलायन्स जिओ आणि डिझाईन प्लॅटफॉर्म कॅनव्हा यांनी हातमिळवणी करत भारतीय युजर्ससाठी एक वर्षासाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये जिओच्या ठराविक रिचार्ज प्लॅनवर कॅनव्हाचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. Canva Pro किंवा Canva Pro Lite हे दोन्ही पर्याय यात मोफत दरात देण्यात येणार असून याची साधारण किंमत 400 रुपये इतकी आहे. ही ऑफर 16 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू करण्यात आली आहे.
कोणत्या प्लॅनवर काय मिळणार, याबद्दल सांगायचं झालं तर 399 रुपयांच्या प्लॅनवर जिओच्या युजर्सना पूर्ण फीचर्स असलेल्या Canva Pro चा एक्सेस मोफत मिळेल. म्हणजेच या प्लॅनमध्ये कॅनव्हाची सगळी प्रीमियम वैशिष्ट्ये वापरता येणार आहेत. तर 349 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या आणि दररोज 2GB डेटा देणाऱ्या प्लॅन्सवर Canva Pro Lite सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. म्हणजेच रिचार्ज प्लॅनच्या किमतीनुसार दोन वेगवेगळ्या दर्जाचे सबस्क्रिप्शन ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
Canva Pro आणि Canva Pro Lite या दोन्ही सबस्क्रिप्शनमध्ये प्रीमियम टेम्पलेट्स, फोटो, व्हिडिओ आणि फॉन्ट्सचा एक्सेस मिळतो. यासोबतच वन-टॅप बॅकग्राउंड रिमूव्हल टूल, प्रिंट-रेडी एक्सपोर्ट, मॅजिक रिसाईज आणि मॅजिक इरेझर यांसारखी वैशिष्ट्येही यात समाविष्ट आहेत. मात्र दोन्ही सबस्क्रिप्शनमध्ये काही फरकही आहेत. Canva Pro मध्ये पाच प्रगत ब्रँड किट्स दिल्या जातात, तर Pro Lite मध्ये तीन मूलभूत ब्रँड किट्स मिळतात. याशिवाय Canva Pro मध्ये कंटेंट प्लॅनर आणि कॅनव्हा एआय चॅटबॉटची सुविधाही आहे, तसेच यात एआय वापराची मर्यादाही जास्त असून प्रगत एआय टूल्सचाही समावेश आहे. स्टोरेजबाबत बोलायचं झालं तर Canva Pro Lite मध्ये 50 GB क्लाउड स्टोरेज मिळते, तर Canva Pro मध्ये 100 GB क्लाउड स्टोरेज मिळते. यावरून स्पष्ट होते की Canva Pro हे Pro Lite पेक्षा अधिक सुविधा देणारे आणि तुलनेने प्रगत सबस्क्रिप्शन आहे.
ही मोफत ऑफर मिळवण्यासाठी युजर्सना कोणतेही अतिरिक्त पैसे किंवा हिडन चार्जेस भरावे लागणार नाहीत, म्हणजेच रिचार्जच्या रकमेव्यतिरिक्त वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. ऑफर क्लेम करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमधील MY JIO APP उघडावे लागेल. त्यानंतर ॲपच्या होम पेजवर किंवा ऑफर सेक्शनमध्ये जाऊन तिथे दिलेल्या Canva Banner किंवा Offer वर टॅप करावे लागेल. त्यानंतर आपले डिटेल्स व्हेरिफाय करून सबस्क्रिप्शन ॲक्टिव्हेट करता येईल. या सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास काही मिनिटांतच सबस्क्रिप्शन सुरू होऊ शकते.
विशेष म्हणजे ही टूल्स मराठी, हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्येही वापरता येणार आहेत. यामुळे छोटे व्यावसायिक, विद्यार्थी आणि क्रिएटर्सना डिझाईन करणे आणखी सोपे होऊ शकते. तसेच डिझाईन इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. एकूणच जिओ आणि कॅनव्हाची ही भागीदारी सामान्य युजर्सपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त ठरणार असल्याचे दिसते.