गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:49 IST

बुलढाणा: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे

जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन करत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

बुलढाणा: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका या खरीप पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत दुष्काळसदृश परिस्थिती तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी पहिली मागणी या निवेदनात मांडण्यात आली. याशिवाय पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना कर्जाबाबत दिलासा द्यावा तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा मागण्याही या निवेदनात नोंदवण्यात आल्या.

दुसरीकडे, ३० आणि ३१ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे तालुक्यातील अनेक नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुरामुळे काही नद्यांच्या प्रवाहात बदल झाला. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे या पुरात वाहून गेली आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढे नुकसान होऊनही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून नुकसानभरपाई मिळालेली नाही, अशी तक्रार आंदोलकांनी यावेळी केली.

या आंदोलनात अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, भागवत वाघ, अजहर शेख, त्रिलोकसिंग राजपूत, राजेंद्र राखुंडे, अशोक राखुंडे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सय्यद भाऊ, नीलेश अवसार, सागर वाघ, सागर गवई, उल्हास झाटे, सचिन झाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण खंडारे आणि गौतम तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. तसेच पुरात वाहून गेलेल्या जनावरांसाठी आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. याखेरीज भविष्यात अशी पूरस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नद्या व नाल्यांचे खोलीकरण करण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ