गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:49 IST

बुलढाण्यात आठ महिन्यात १३ लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटीच्या मोफत अमृत योजनेचा लाभ

बुलढाणा आगारातून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी अमृत योजनेअंतर्गत मोफत प्रवास करत देवदर्शन आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी सुकर केल्या.

बुलढाण्यात आठ महिन्यात १३ लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटीच्या मोफत अमृत योजनेचा लाभ
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या अमृत मोफत प्रवास पास योजनेला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुलढाणा आगारातून गेल्या आठ महिन्यात तब्बल १३ लाख ४३ हजार १७२ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झाली आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुखकर पद्धतीने प्रवास करता यावा, या हेतूने ही योजना सुरू केली होती.

वाढत्या वयामुळे देवदर्शनाला किंवा नातेवाईकांना भेटायला जाण्याची इच्छा असूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक बजेटमुळे प्रवासखर्च परवडत नव्हता, त्यामुळे त्यांना मनातली इच्छा मनातच ठेवावी लागत असे. एसटी महामंडळाने ही योजना अमलात आणून त्यांना एकप्रकारे दिलासा दिला आहे. लालपरी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नातेवाईकांना भेटणे, देवदर्शनाला जाणे तसेच वैयक्तिक कामांसाठी प्रवास करणे ज्येष्ठांना आता अधिक सोयीचे झाले आहे.

ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठांसाठी मोठा आधार ठरत आहे. गावातून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस हा अनेकांचा प्रमुख पर्याय आहे. ज्येष्ठांना आर्थिक दिलासा देतानाच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याचे काम ही योजना करत आहे. मोफत प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक आत्मविश्वासाने प्रवास करत असून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हीच या योजनेच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

राज्यात कुठेही देवदर्शनाला जाण्याची इच्छा झाल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता कुठलीही चिंता करण्याचे कारण राहिलेले नाही. अमृत मोफत प्रवास योजनेअंतर्गत धार्मिक स्थळांना जाण्यासाठी मोफत प्रवास मिळत असल्याने पैशाची चिंता मिटली आहे, आणि त्यामुळे एसटीच्या या सुखकर प्रवासाला ज्येष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड असणे आवश्यक आहे. एसटीच्या या मोफत योजनांमुळे बसमध्ये महिला आणि वृद्धांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

ज्येष्ठ नागरिक जनार्दन पवार म्हणाले की, देवदर्शनाला खासगी वाहनाने जाण्यासाठी आधी अतिरिक्त खर्च येत असे. आर्थिक बजेट नसल्याने धार्मिक स्थळांना जाण्याची इच्छा असूनही जाता येत नव्हते, मात्र अमृत मोफत प्रवास योजनेमुळे देवदर्शनाला जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

बुलढाण्याच्या विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट म्हणाल्या की, एसटी महामंडळाच्या वतीने सन्मान योजना, अमृत योजना आणि ज्येष्ठांसाठीच्या योजनांच्या माध्यमातून प्रवाशांच्या प्रवासावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ