रविवार, 20 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
19 सप | 17:20  IIT बॉम्बे में स्टूडेंट की मौत, एग्जाम में ChatGPT यूज करने का मामला, 400 से ज्यादा स्टूडेंट्स का प्रदर्शन 19 सप | 16:40  नाशिक: नांदगांव में आठ महीने की बच्ची बिस्तर से गायब, अपहरण की आशंका 19 सप | 16:00  सावनेर में आंधी-बारिश का कहर, पेड़ गिरने और बिजली गिरने से दो लोगों की मौत 19 सप | 15:39  नागपुरात राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन, गडकरी-फडणवीसांची उपस्थिती, पुलाला डॉ. हेडगेवार यांचे 19 सप | 22:25  नागपुरात 'अमृत-2'ची सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई होणार: मुख्यमंत्री 19 सप | 21:54  दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार द्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही: सपकाळ यांचा इशारा
सर्व थेट अपडेट
01:03 IST

बल्लारपूर एसएनडीटी उपकेंद्रासाठी ७ कोटींची मागणी; मुनगंटीवारांचा पुढाकार

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या उपकेंद्रात आढावा बैठक; पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम मूल्यांकन आणि केंद्रीय दर्जासाठी हालचाली.

बल्लारपूर एसएनडीटी उपकेंद्रासाठी ७ कोटींची मागणी; मुनगंटीवारांचा पुढाकार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या उपकेंद्राला आधुनिक शिक्षणाचं मोठं केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत नुकतीच याबाबत आढावा बैठक झाली.

या बैठकीत उपकेंद्रातल्या अत्याधुनिक कामांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ७ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसंच शासकीय तंत्रनिकेतन मूलच्या इमारतीसाठी लागणारी खासगी जमीन थेट वाटाघाटीनं विकत घेण्यासाठी ५.५० कोटी रुपयांची तरतूद सुचवली गेली. विद्यापीठातल्या ६२ अभ्यासक्रमांचं मूल्यांकन करून त्यांना जागतिक दर्जा द्यायचा आणि परदेशातल्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करायचा, यावरही या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक राजेश इंगोले, उपकुलसचिव बाळू राठोड, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता संजोग मेंढे आणि कार्यकारी अभियंता (विद्युत) पूनम वर्मा उपस्थित होते.

उपकेंद्रातल्या सुविधांना मातृत्व संकल्पनेवर आधारित आधुनिक आणि नाविन्यपूर्ण स्वरूप द्यावं, अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली. विद्यार्थिनींना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावं यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यावर त्यांनी भर दिला. जमीन मिळाल्यावर तंत्रनिकेतनच्या इमारतीचं बांधकाम वेगानं पुढे जाईल आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उभ्या राहतील, असं त्यांनी सांगितलं. बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थिनींना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी हे उपकेंद्र भविष्यात शिक्षण, कौशल्य आणि संशोधनाचं मोठं केंद्र म्हणून विकसित व्हावं, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

६२ अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती घेऊन त्यांचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबईत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचना मुनगंटीवार यांनी वेणूगोपाल रेड्डी यांना दिली. बदलत्या उद्योग क्षेत्राच्या गरजा, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातली कौशल्यं लक्षात घेऊन अभ्यासक्रमांत सुधारणा करायला हव्यात, यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थिनींना फक्त पदवीचं शिक्षण न देता आधुनिक कौशल्यं, संशोधनाची दृष्टी आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची क्षमता मिळावी, यासाठी हे मूल्यांकन महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

एसएनडीटी महिला विद्यापीठानं ऑक्सफर्ड, केंब्रिजसारख्या जगातल्या दहा नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करारासाठी प्रस्ताव पाठवावेत, अशीही सूचना मुनगंटीवार यांनी केली. यामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानव्यवस्थेशी जोडलं जाण्याची संधी मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईला केंद्रीय महिला विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी मुनगंटीवार यांनी नुकताच नवी दिल्लीत उपराष्ट्रपती आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या दर्जामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तारासोबतच संशोधन, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक सहकार्याला मोठ्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत उपकेंद्र परिसरातल्या ईएसआयसी हॉस्पिटल, एसआरपीएफ कॅम्प आणि आयुष रुग्णालय या प्रस्तावित व सुरू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे परिसरातल्या शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक सुविधांना बळकटी मिळेल, असं सांगण्यात आलं. बैठकीनंतर वेणूगोपाल रेड्डी यांच्यासोबत मुनगंटीवार यांनी उपकेंद्र परिसरातल्या सुरू असलेल्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि निधी, बांधकामाचा दर्जा व भविष्यातल्या गरजांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ