गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

यूएईकडून भारतात ओडिशातील अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी १.१० लाख कोटींची गुंतवणूक

पंतप्रधान मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख खालिद यांच्यातील बैठकीत भारत-यूएई आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर शिक्कामोर्तब.

यूएईकडून भारतात ओडिशातील अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी १.१० लाख कोटींची गुंतवणूक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील आर्थिक भागीदारीला नवं वळण मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत यूएई भारतात तब्बल १.१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं.

भारत सध्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करत असून याच निमित्ताने अबू धाबीचे युवराज शेख खालिद हे या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान मोदी यांनी शेख खालिद यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि यूएई यांच्यातील वाढत्या आर्थिक आणि सामरिक संबंधांचा आढावा घेतला.

बैठकीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, यूएई इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी भारतातील ओडिशा राज्यात एका एकात्मिक ग्रीनफिल्ड अॅल्युमिनियम प्रकल्पात ११.५ अब्ज डॉलर्स, म्हणजेच जवळपास १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मोदी आणि शेख खालिद यांनी या घोषणेचं स्वागत केलं. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठी एकात्मिक अॅल्युमिनियम गुंतवणूक ठरणार असून त्यामुळे ओडिशा हे जागतिक अॅल्युमिनियम उत्पादन केंद्र म्हणून पुढं येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर या भेटीबद्दल लिहिताना म्हटलं की, गेल्या काही वर्षांत भारत-यूएई संबंधांमध्ये मोठा बदल झाला असून आता दोन्ही देश आपल्या महत्त्वाकांक्षा आणखी उंचावत आहेत. शेख खालिद यांची भेट झाल्याचा आनंद व्यक्त करत मोदींनी संरक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अवकाश आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांत स्ट्रॅटेजिक भागीदारी पुढे नेण्यावर चर्चा झाल्याचं नमूद केलं.

यूएईची इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी म्हणजेच IHC मध्ये अबू धाबीस्थित रॉयल ग्रुप या व्यावसायिक समूहाची बहुसंख्य हिस्सेदारी आहे. सत्ताधारी अल नाह्यान कुटुंबाचं रॉयल ग्रुपवर नियंत्रण असून त्यांच्याकडे कंपनीत ६१ टक्के हिस्सेदारी आहे. IHC चं नेतृत्व आणि देखरेख शेख तहनून बिन झायेद अल नाह्यान करतात. ते यूएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे बंधू आहेत. शेख मोहम्मद बिन झायेद हेच IHC चे अध्यक्षही आहेत. IHC ही अबू धाबी सिक्युरिटीज एक्सचेंज म्हणजेच ADX वर सूचीबद्ध असलेली सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी असल्यानं तिचे इतर संस्थात्मक आणि सार्वजनिक भागधारकही आहेत.

याच बैठकीत भारत आणि यूएई यांनी ब्रिक्स या व्यासपीठाद्वारे आपापसातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर आणि सामायिक हितसंबंध पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत राहण्यावर सहमती दर्शवली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ