गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:26 IST

नागपूरच्या व्हीएनआयटीत आठ नवे कोर्सेस, कॅन्सर इनोव्हेशन सेंटरही सुरू

व्हीएनआयटीच्या २४व्या दीक्षांत समारंभाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेने नवे अभ्यासक्रम आणि कॅन्सर संशोधन केंद्राची माहिती दिली.

नागपूरच्या व्हीएनआयटीत आठ नवे कोर्सेस, कॅन्सर इनोव्हेशन सेंटरही सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूरच्या विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच व्हीएनआयटीने शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. संस्थेने पाच नवे पदवी अभ्यासक्रम आणि तीन नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

त्याचबरोबर कॅन्सरच्या क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी कॅन्सर इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या २४व्या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

नव्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, गणित आणि कॉम्प्युटिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग फिजिक्स आणि चायोप्रोसेस टेक्नॉलॉजीशी संबंधित केमिकल टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. पदव्युत्तर पातळीवर अ‍ॅडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये एमबीए, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि कंट्रोल अँड ऑटोमेशन हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

व्हीएनआयटीत कॅन्सर इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन १३ जुलैला झालं होतं. आतापर्यंत कॅन्सर क्षेत्रातील १५ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून, त्यांना संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग विकासासाठी मार्गदर्शन दिलं जाणार आहे. याशिवाय बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजीशी संबंधित संशोधनालाही चालना दिली जात आहे.

गेल्या एका वर्षात व्हीएनआयटीला ३३ कोटी रुपयांचे सल्लागार प्रोजेक्ट मिळाले आहेत. संस्थेने आयआयटी मुंबई, आयआयटी जोधपूर आणि आयआयटी दिल्लीसोबत करार केले आहेत. आयआयटी मुंबईत व्हीएनआयटीचे २० पदवीचे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. तिथे एक वर्ष शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे क्रेडिट्स व्हीएनआयटीमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत.

प्लेसमेंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांना ८४३ नोकऱ्यांच्या संधी मिळाल्या. यात सर्वाधिक वार्षिक पॅकेज ५८.३ लाख रुपये होतं, तर सरासरी पॅकेज १०.४५ लाख रुपये होतं. संस्थेच्या मते, त्यांचा भर फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यावरही आहे.

व्हीएनआयटीचा २४वा दीक्षांत समारंभ १५ सप्टेंबरला होणार आहे. संस्था दरवर्षी इंजिनिअर्स डेला आपला दीक्षांत समारंभ आयोजित करते. या समारंभाला निती आयोगाचे सदस्य डॉ. आर. बालासुब्रमण्यम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष मदा भूषी मदन गोपाल, संचालक प्रो. प्रेम लाल पटेल आणि डीन अकॅडमिक प्रो. विलास कलामकर हेदेखील या समारंभाला प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

समारंभात एकूण १५४७ पदव्या दिल्या जाणार आहेत. यात ५९ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी, विविध इंजिनिअरिंग विषयांतील ५९५ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि विविध विज्ञान विषयांतील ६४ मास्टर ऑफ सायन्स पदव्यांचा समावेश आहे.

याशिवाय विविध इंजिनिअरिंग विषयांतील ७६१ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि ६८ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्यांचाही यात समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना पदकं आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ