New Launch: विवोचा 7,200mAh महाबॅटरीचा नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
विवो कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत Vivo V80 नावाचा नवा 5G फोन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अजून या फोनसाठी अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही, पण अलीकडच्या अहवालांनुसार हा फोन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मार्केटमध्ये येऊ शकतो. मोठी बॅटरी, एआय पॉवर्ड कॅमेरा आणि कंटेंट क्रिएशनसाठी काही नवे फीचर्स हे या फोनचं वैशिष्ट्य असणार आहे. आधी या फोनच्या काही महत्त्वाच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.
डिस्प्लेबाबत बोलायचं झालं तर Vivo V80 मध्ये 6.59-इंचाचा 1.5K अमोलेड डिस्प्ले असेल, अशी शक्यता आहे. हा डिस्प्ले 144Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल आणि याची पीक ब्राइटनेस 6,000 निट्सपर्यंत जाऊ शकते. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये क्वालकॉमचं स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 चिपसेट असण्याची शक्यता आहे. सोबत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल, असं सांगितलं जातंय.
या फोनची सगळ्यात मोठी खासियत असणार आहे ती म्हणजे त्याची बॅटरी. अहवालांनुसार, Vivo V80 मध्ये 7,200mAh क्षमतेची बॅटरी असेल आणि सोबत फास्ट चार्जिंगचा सपोर्टही मिळेल. याशिवाय या फोनला IP68 आणि IP69 हे रेटिंग्सही मिळू शकतात, ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून फोनला चांगलं संरक्षण मिळतं. म्हणजे रोजच्या वापरात धूळ किंवा पावसाच्या पाण्याची फारशी काळजी करावी लागणार नाही.
कॅमेऱ्याच्या बाबतीत या फोनमध्ये 30 हून जास्त इफेक्ट्स असलेला एआय क्रिएटिव्ह कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सना कॅमेरा ॲपमधूनच थेट सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडिओ तयार करता येतील. फोनमध्ये लाइव्ह स्टिकर कोलाज हे फीचरही असू शकतं, ज्याच्या मदतीने फोटो आणि स्टिकर्स एकत्र करून कस्टम क्रिएशन्स बनवता येतील.
याशिवाय Vivo V80 च्या कॅमेऱ्यात एआय दिवाळी पोर्ट्रेट 2.0 हे फीचरही असू शकतं. हे फीचर कंपनीच्या आधीच्या V-सिरीज फोन्समधल्या फेस्टिव्ह फोटोग्राफी टूल्सची अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे, म्हणजे सणासुदीच्या काळात फोटो काढण्यासाठी आधीच्या फोन्समध्ये जे फीचर्स होते, त्यातच आणखी सुधारणा करून हे फीचर दिलं जाणार आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचं तर या फोनमध्ये 50MP झाईस (ZEISS) टेलिफोटो कॅमेरा असेल, ज्याला 3x ऑप्टिकल झूम आणि 10x पर्यंत पोर्ट्रेट झूमचा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 4K सिनेमॅटिक व्हिडिओ रेकॉर्डिंग, बिल्ट-इन कलर ग्रेडिंग आणि अनेक मूव्ही-स्टाईल प्रीसेट्सही मिळण्याची शक्यता आहे. यामुळे व्हिडिओ शूट करताना युजर्सना वेगवेगळे लूक आणि स्टाईल फोनमध्येच निवडता येतील.