गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:42 IST

वणी हिंगणघाटच्या सगुना कंपनीत पशुखाद्य लंपास, उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना अटक

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी सोया डीओसी पशुखाद्याच्या अपहाराच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना पकडले असून, सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वणी हिंगणघाटच्या सगुना कंपनीत पशुखाद्य लंपास, उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना अटक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

छोटी वणी हिंगणघाट येथील सगुना कंपनीचे मॅनेजर आणि फिर्यादी जानकीराम आदिविरा (वय 58, राहणार आदिगपेठ पॉडेचेरी, ह.मु. जोगनपुत्रा लेआऊट हिंगणघाट) यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला 19 ऑगस्ट 2026 रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून अपराध क्रमांक 1342/26 अन्वये कलम 316(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, 1 ऑगस्ट 2026 रोजी यु.पी. 42 डी.टी. 3644 क्रमांकाच्या ट्रेलरच्या चालकाने सगुना कंपनीतून 41.960 मेट्रिक टन सोया डीओसी पशुखाद्य भरले होते. या मालाची किंमत 29 लाख 28 हजार 95 रुपये इतकी होती. हा माल बिहार राज्यातील मुजफ्फर येथील कंपनीला पोहोचवायचा होता. मात्र चालकाने हा माल तिथे न पोहोचवता मध्येच लंपास केला आणि तो फरार झाला. यामुळे फिर्यादीचा विश्वासघात झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या सूचनेनुसार हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपी आणि मालाच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर गाठले. तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रेलर ट्रकचा क्लीनर युगराजसिंग यादव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आणि ट्रेलरचा चालक अंशुल वर्मा (राहणार अयोध्या) या दोघांनी मिळून सगुना कंपनीतून नेलेले सोया डीओसी पशुखाद्य उत्तर प्रदेशातील एका कुक्कुटपालन व्यावसायिकाला विकल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी ट्रेलरचा चालक अंशुल वर्मा (राहणार मजगाव, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) यालाही ताब्यात घेतले. दोघा आरोपींची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन ढेप पशुखाद्य उत्तर प्रदेशातील कुक्कुटपालन व्यावसायिकांना विकल्याचे मान्य केले. या कुक्कुटपालन व्यावसायिकाकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मालापैकी एकूण 96 बोरी कुक्कुटपालन खाद्य, ज्याची किंमत अंदाजे 4 लाख 30 हजार 560 रुपये आहे, ते जप्त केले. सोबतच गुन्ह्यात वापरलेला यु.पी. 42 डी.टी. 3644 क्रमांकाचा ट्रेलर ट्रक, ज्याची किंमत 45 लाख रुपये आहे, तोही जप्त करण्यात आला.

याशिवाय दोन्ही आरोपींनी मालाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला. यात व्हिओ कंपनीचा टी 4 आर मॉडेलचा मोबाईल (20 हजार रुपये), सैमसंग एफ 17 मोबाईल (20 हजार रुपये), निळसर निलम खडा असलेली पांढऱ्या धातूची अंगठी (30 हजार रुपये), पांढऱ्या धातूची चांदीची गळ्यातील चेन (10 हजार रुपये) आणि पांढऱ्या धातूचे हातातील चांदीचे ब्रेसलेट (10 हजार रुपये) यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण 50 लाख 20 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात आरोपी अशुल मनसाराम वर्मा (वय 33, राहणार मजगाव, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) आणि युगराजसिंग श्रीरामअधीन यादव (वय 27, राहणार भवानीपूर, जिल्हा भदोही, उत्तर प्रदेश) यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

ही कारवाई वर्धाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक डी.जी. पळनोटे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, पोलीस नायक नरेंद्र आरेकर आणि पोलीस शिपाई ताबिष बेग यांनी ही कारवाई पार पाडली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ