गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:14 IST

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर

कर्मचारी निवड आयोगाने संगणक आधारित भरती परीक्षेतील उमेदवार आणि केंद्रावरील कर्मचाऱ्यांसाठी नवी ॲडव्हायजरी जारी केली आहे.

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संगणक आधारित भरती परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी आणि परीक्षा केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवी ॲडव्हायजरी काढली आहे. यात आयोगाने परीक्षा केंद्रावरच्या कॉम्प्युटर सिस्टीमबाबत काही गोष्टींवर स्पष्ट बंदी घातली आहे. आता परीक्षा सुरू असताना उमेदवार असो किंवा परीक्षेचा स्टाफ, कुणीही स्वतःहून कॉम्प्युटर रीस्टार्ट करणे, शटडाउन करणे किंवा सिस्टीम बदलणे शक्य होणार नाही. असं काही करायचं झालंच तर त्यासाठी अधिकृत परीक्षा स्टाफची परवानगी घ्यावी लागेल आणि ठरवून दिलेली प्रोसेस पाळावी लागेल. म्हणजेच परीक्षा केंद्रावरच्या कॉम्प्युटरशी संबंधित कुठलाही निर्णय आता उमेदवाराच्या हातात राहणार नाही, तर तो पूर्णपणे नियमांनुसार आणि अधिकृत यंत्रणेमार्फतच घेतला जाईल.

आयोगाच्या म्हणण्यानुसार, मागच्या काही परीक्षांमध्ये असे प्रकार समोर आले होते जिथे कोणतीही टेक्निकल अडचण नसतानाही काही उमेदवारांनी स्वतः किंवा स्टाफच्या मदतीने कॉम्प्युटर सिस्टीम रीस्टार्ट करण्याचा, बदलण्याचा किंवा त्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. अशा हालचालींमुळे परीक्षेची निष्पक्षता आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, असं आयोगाला वाटतं, आणि म्हणूनच ही नवी नियमावली आणली गेली आहे. थोडक्यात, आधी घडलेल्या अशा घटनांमुळेच आयोगाला ही ॲडव्हायजरी काढण्याची गरज वाटली, जेणेकरून पुढच्या परीक्षांमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नयेत.

नव्या ॲडव्हायजरीनुसार परीक्षा केंद्रावर उमेदवाराला स्वतःहून कॉम्प्युटर रीस्टार्ट किंवा शटडाउन करता येणार नाही. कॉम्प्युटर किंवा मॉनिटर बदलण्यावरही तशीच बंदी असेल. अशी काही गरज पडलीच, तर ते काम फक्त अधिकृत परीक्षा कर्मचाऱ्यांकडूनच, ठरलेल्या नियमांनुसारच केलं जाईल. उमेदवाराला सिस्टीममध्ये स्वतः कुठलाही बदल करायची मुभा दिली जाणार नाही. म्हणजे कॉम्प्युटर किंवा मॉनिटरमध्ये काही बिघाड झाला तरी उमेदवाराने स्वतःहून त्यात हात घालायचा नाही, हे काम फक्त केंद्रावरच्या अधिकृत कर्मचाऱ्यांचंच असेल.

परीक्षा सुरू होण्याआधी किंवा पेपर चालू असताना कॉम्प्युटरमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, तर उमेदवाराने तो स्वतः सोडवायचा प्रयत्न करू नये असं आयोगाने स्पष्ट सांगितलं आहे. अशा वेळी लगेच सेंटरच्या स्टाफला, इनविजिलेटरला किंवा परीक्षा कर्मचाऱ्यांना कळवावं लागेल. मग सेंटरचा स्टाफ ती अडचण तपासून पुढे काय करायचं ते ठरवेल. या सगळ्या प्रोसेसमध्ये रीजनल ऑफिसचा अधिकृत प्रतिनिधी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर किंवा सेंटर कोऑर्डिनेटर यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलंही पाऊल उचललं जाणार नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, तांत्रिक अडचण आली तरी त्यावरचा उपाय कोणी आणि कसा करायचा, याचीही एक स्पष्ट साखळी आयोगाने ठरवून दिली आहे.

SSC ने ॲडव्हायजरीत स्पष्ट केलंय की, एखादा उमेदवार किंवा परीक्षा कर्मचारी परवानगीशिवाय कॉम्प्युटर सिस्टीमशी कुठल्याही प्रकारे छेडछाड करताना सापडला, तर त्याच्यावर लिखित नियमांनुसार कारवाई केली जाईल. ही कारवाई त्या-त्या परीक्षेला लागू असलेल्या नियमांनुसार आणि संबंधित परीक्षेच्या नोटीसमध्ये दिलेल्या तरतुदींनुसार होईल. आयोगाने उमेदवार आणि परीक्षा कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर सिस्टीम आणि परीक्षेशी संबंधित उपकरणं यांच्याशी विनाकारण छेडछाड करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ