Shilpa Shetty Dance: 'ऐसी मेरी Vibe'च्या तालावर थिरकली शिल्पा शेट्टी; भन्नाट डान्स करत सेलिब्रिटींना दिलं
कुणाल खेमूच्या 'VIBE' चित्रपटातील 'ऐसी मेरी Vibe' या गाण्यावर शिल्पा शेट्टीने भन्नाट डान्स केला असून, तिने प्रीती झिंटा, जेनेलिया देशमुख आणि करीना कपूर खान यांनाही या गाण्यावर थिरकण्याचं चॅलेंज दिलं आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कुणाल खेमूची प्रमुख भूमिका असलेल्या 'VIBE' या हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, आणि त्यातल्या अॅक्शन, कॉमेडी, गोंधळ आणि अनपेक्षित ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. यातच चित्रपटातलं एनर्जेटिक गाणं 'ऐसी मेरी Vibe' प्रेक्षकांना खूप आवडतंय.
कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या दणदणीत डान्स परफॉर्मन्समुळे हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झालं. आता अनेकजण या गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसतायत. क्रिकेटपटू रोहित शर्मानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही या 'ऐसी मेरी Vibe' फीव्हरमध्ये सामील झाली आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती 'VIBE' चित्रपटातल्या 'ऐसी मेरी Vibe' गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसते. या ट्रेंडमध्ये सहभागी होत तिने गाण्याच्या तालावर थिरकत आपली खास 'Vibe' दाखवली. या गाण्याच्या तालावर सध्या अनेकजण असाच डान्स करताना दिसत असून, शिल्पा शेट्टीही आता त्यात सामील झाली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने कुणाल खेमूच्या कामाचं कौतुक केलं. "Bitten by the #VIBE bug" असं म्हणत तिने चित्रपट बघण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. यात खास बाब म्हणजे तिने प्रीती झिंटाला टॅग करत 'मी केलं' असं सांगितलं, आणि त्यानंतर जेनेलिया देशमुखलाही हा डान्स करण्याचं चॅलेंज दिलं.
इतकंच नाही, शिल्पा शेट्टीने वंशिका धीरचंही कौतुक केलं आणि स्पर्श श्रीवास्तवच्या डान्स मूव्ह्जचीही स्तुती केली. शेवटी तिने सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खानला टॅग करत, तिलाही या गाण्यावर थिरकताना बघण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे तिने एकाच व्हिडीओत अनेक कलाकारांना या ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.
शिल्पा शेट्टीच्या या मजेशीर अंदाजामुळे 'ऐसी मेरी Vibe'ची क्रेझ पुन्हा एकदा समोर आली आहे. तिच्या या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.
कुणाल खेमूने 'VIBE'चं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी Drongo Filmsच्या बॅनरखाली Amazon MGM Studiosच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात कुणाल खेमूसोबत प्रीती जी. झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि पदार्पण करणारी वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 'VIBE' हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.