गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:22 IST

शरीरातील सूज कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल, जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत

धावपळीची जीवनशैली, ताण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरात सूज वाढते. ही सूज वेळीच कमी केली नाही तर किडनी, हृदय आणि लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यावर आहारातून कसा उपाय करता येईल, ते बघूया.

शरीरातील सूज कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल, जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सध्याची लाइफस्टाइल पार बदलून गेलीये. सतत धावपळ, ऑफिसचा ताण, झोप पूर्ण न होणं, जेवणाच्या वेळा चुकणं आणि पोषक घटकांची कमतरता या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यामुळे शरीरात सूज म्हणजेच इन्फ्लमेशन वाढायला लागते. खरंतर सूज ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एखादी जखम झाली किंवा शरीरात इन्फेक्शन गेलं की रोगप्रतिकारशक्ती त्या भागात सूज आणून शरीराचं रक्षण करते. पण ही सूज वारंवार येत राहिली किंवा लवकर कमी होत नसेल तर मात्र दुर्लक्ष करून चालत नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करणं गरजेचं आहे, नाहीतर किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

दीर्घकाळ राहणारी सूज ही नुसती एक लक्षण नसते, तर ती लठ्ठपणा, हृदयाचे आजार, लिव्हर आणि किडनीच्या आजारांशीही जोडलेली असू शकते. त्यामुळे सूज आली की ती सामान्य समजून सोडून न देता वेळीच त्यावर काम करायला हवं. यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्या रोजच्या आहारात काही बदल करणं. कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीरातला दाह किंवा सूज कमी व्हायला मदत होते, हे बघूया.

सगळ्यात आधी ओमेगा-३ फॅटी ॲसिडने भरपूर असलेले पदार्थ आहारात असायलाच हवेत. यात अळशीच्या बिया, चिया सीड्स, अक्रोड यांचा समावेश करता येईल. याशिवाय साल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारखे मासे सुद्धा खाता येतील. हे स्निग्ध मासे ओमेगा-३ चे उत्तम सोर्स मानले जातात. रोज ओमेगा-३ फॅटी ऍसिड घेतलं की सूज कमी व्हायला आणि एकूण आरोग्य सुधारायला मदत होते.

याशिवाय ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अँटीइन्फ्लमेशन असणारा आहार घेतला की सूज कमी होऊन शरीर बरं वाटायला लागतं. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, संत्री-मोसंबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या आणि इतर रंगीबेरंगी भाज्या नियमित खाव्यात. या पदार्थांमुळे शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज दोन्ही कमी होतात. त्यामुळे पॅकबंद पदार्थांऐवजी ताजी फळं-भाज्या खाण्याची सवय लावून घेतलेली बरी.

सुकामेवा हा सुद्धा या यादीत महत्त्वाचा आहे. बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाणं शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. भाज्यांसोबतच सुकामेवा खाल्ल्याने शरीरातल्या पेशींचं रक्षण व्हायला मदत होते. ओट्स, बार्ली, वेगवेगळ्या डाळी, बीन्स आणि मसूर यांच्यातही पुरेसं फायबर असतं, त्यामुळे हे पदार्थही आहारात नियमित असावेत.

हा लेख फक्त सर्वसाधारण माहितीसाठी आहे, यात कुठल्याही उपचाराचा दावा केलेला नाही. काहीही करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ