गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:42 IST

चार्जिंग आणि पेट्रोलचं झंझटच संपलं! तब्बल 1,705 किमी रेंजसह लॉन्च होणार ही तगडी SUV

शाओमीने ऑटोमोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवत स्कायनोमॅड SUV लाँच केलीय, ज्यातल्या टॉप मॉडेलने एका चार्ज आणि पेट्रोल टाकीच्या जोरावर तब्बल 1,705 किमी चालण्याचा दावा केलाय.

चार्जिंग आणि पेट्रोलचं झंझटच संपलं! तब्बल 1,705 किमी रेंजसह लॉन्च होणार ही तगडी SUV छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमीने आता गाड्यांच्या दुनियेत पाऊल ठेवलंय. कंपनीने 'स्कायनोमॅड' (SkyNomad) नावाची नवी SUV लाँच केली असून तिच्या टॉप व्हेरियंटने एका चार्ज आणि पेट्रोल टाकीच्या जोरावर तब्बल 1,705 किलोमीटर चालण्याचा दावा केलाय.

ही गाडी नेहमीच्या हायब्रिड कारसारखी नाहीय. यात 'रेंज-एक्सटेंडेड' इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आलीय, म्हणजे रोजच्या वापरात गाडी पूर्ण बॅटरीवरच चालते आणि बॅटरी संपली की मगच त्यात बसवलेलं छोटं पेट्रोल इंजिन सुरू होतं. कंपनीने या SUV सिरीजमध्ये एकूण चार मॉडेल्स आणलेत.

यातलं N70 Pro हे 5-सीटर, फ्रंट-व्हील-ड्राइव्ह मॉडेल असून त्यात 52kWh बॅटरी दिलीय. फक्त बॅटरीवर ही गाडी 351 किमी आणि पेट्रोल इंजिनसह एकूण 1,351 किमी चालते. दुसरं मॉडेल N70 Max यात ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम आणि मोठी 76kWh बॅटरी मिळते, जी शुद्ध बॅटरीवर 505 किमी आणि एकूण 1,461 किमीची रेंज देते.

सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं N90 Max हे 7-सीटर मॉडेल आहे, ज्यानं 1,705 किमीच्या रेकॉर्ड रेंजचा दावा केलाय. यातही 76kWh बॅटरी असून बसण्याची रचना '2+2+3' अशी ठेवलीय. फक्त बॅटरीवर ही गाडी 464 किमी धावते, त्यानंतर रेंज एक्सटेंडर उर्वरित प्रवास पूर्ण करतो. चौथं आणि सगळ्यात प्रीमियम मॉडेल म्हणजे N90 Max Studio.

या चारही मॉडेल्सची किंमत RMB 209,900 ते RMB 299,900 च्या दरम्यान ठेवलीय, जी भारतीय चलनात साधारण 29.66 लाख ते 42.38 लाख रुपयांच्या घरात बसते.

सुरक्षेच्या बाबतीत कंपनीने काहीच कमी ठेवलेलं नाही. N70 मॉडेलमध्ये 9 एअरबॅग्स तर मोठ्या N90 Max मध्ये तब्बल 12 एअरबॅग्स देण्यात आल्यात. सोबतच सगळ्या व्हेरियंटमध्ये Nvidia Thor-U असिस्टेड-ड्रायव्हिंग चिप, LiDAR आणि 4D मिलिमीटर-वेव्ह रडारसह 25 अडव्हान्स ड्रायव्हर-असिस्टन्स फीचर्स स्टँडर्ड दिलेत.

N90 Max Studio या टॉप मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक लिफ्टिंग रूफ आहे, ज्यामुळे केबिनची उंची 2,294 मिमीपर्यंत वाढते. यातल्या दुसऱ्या रांगेतल्या सीट्सचं 1,870 मिमी लांबीच्या बेडमध्ये रूपांतर करता येतं. या मॉडेलमध्ये आणखी बरेच वेगळे आणि आरामदायी फीचर्स दिलेत, ज्यात फ्लोर हीटिंग आणि इन-बिल्ट प्रोजेक्शन सिस्टीमही केबिनमध्ये मिळते.

ही गाडी पारंपारिक हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये एक नवा बदल घडवून आणणारी मानली जातेय, कारण चार्जिंग आणि पेट्रोलची चिंता दोन्ही एकाच वेळी संपवण्याचा प्रयत्न यातून झालेला दिसतो.

सध्या तरी ही गाडी चीनबाहेर, म्हणजे भारतासारख्या इतर देशांत लाँच करण्याबाबत शाओमीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी ही SUV सध्या तंत्रज्ञानाचा एक नवा मापदंड ठरतेय, आणि भारतातल्या ग्राहकांना तिच्या लाँचसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ