साप्ताहिक राशीभविष्य: १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात कोणत्या राशीला काय फायदा-तोटा
सप्टेंबरचा तिसरा आठवडा हरतालिका, गणेश चतुर्थी, गौरी आगमन आणि विसर्जनामुळे धार्मिकदृष्ट्या खास आहे. मेष ते मीन राशीसाठी हा आठवडा नेमका कसा जाणार ते बघा.
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा एकूणच अनुकूल जाणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हरतालिका आणि गणेश चतुर्थी आहे, शिवाय गौरी आगमन आणि गौरी गणपती विसर्जनही याच आठवड्यात येतंय. त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा आठवडा खूप खास मानला जातोय. नोकरी-धंदा करणाऱ्यांसाठी मात्र हा आठवडा साधारण म्हणजे नेहमीसारखाच जाईल. मेष पासून मीन पर्यंत प्रत्येक राशीसाठी आठवडा कसा राहील, ते बघूया.
मेष राशीच्या लोकांचा आठवडा चांगला जाईल, पण अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तब्येतीच्या दृष्टीने आठवडा पोषक असेल आणि नातेसंबंधही चांगले राहतील. गाडी चालवताना मात्र काळजी घ्या आणि नियम पाळा, नाहीतर पैशाचं नुकसान होऊ शकतं.
वृषभ राशीसाठी आठवडा संमिश्र राहील. आत्मविश्वास वाढलेला जाणवेल आणि प्रवासाचा योग येऊ शकतो. जमीन-मालमत्तेच्या कामात अपेक्षित यश मिळेल. वादावादीपासून लांब राहा. धंद्यातही अपेक्षित यश मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठीही आठवडा चांगला जाईल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवडा अनुकूल असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल, नोकरी करणाऱ्यांचाही आठवडा चांगला जाईल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात अपेक्षित यश मिळेल आणि तिथल्या अडचणी दूर होतील. तब्येतीच्या तक्रारीही कमी होतील.
कर्क राशीसाठी आठवडा साधारण जाईल. नोकरी-धंदा करणाऱ्यांचा आठवडा मात्र चांगला असेल. घरात आनंदाचं वातावरण राहील, फक्त वादावादीपासून दूर राहा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक बाजू भक्कम राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आठवडा अनुकूल असेल, हातातली कामं पूर्ण होतील आणि घरातल्या अडचणी सुटतील. पण या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतो आणि धंद्यात चढ-उतार जाणवू शकतात. अपघात होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. जमीन-मालमत्तेच्या बाबतीतही अडचणी येऊ शकतात.
कन्या राशीसाठी आठवडा चांगला जाईल. ठरवलेली कामं वेळेत पूर्ण होतील आणि रखडलेली कामंही मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग येऊ शकतो. धंद्याशी संबंधित लोकांनी गुंतवणूक करावी. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीसाठी आठवडा संमिश्र राहील. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, नोकरी करणाऱ्यांचाही आठवडा चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी मात्र आठवडा साधारण असेल.
वृश्चिक राशीसाठी आठवडा साधारण जाईल. कामाच्या ठिकाणी सावध राहा, एखादी मोठी समस्या टेन्शनचं कारण बनू शकते. नातेसंबंध मात्र चांगले राहतील. कुठलाही निर्णय विचार करूनच घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेच्या अडचणी सुटतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील.
धनु राशीसाठी आठवडा अनुकूल असेल. आठवड्यातली सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. नोकरी-धंदा करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. धंद्याशी संबंधित अडचणी दूर होतील आणि धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.
मकर राशीसाठी आठवडा चांगला जाईल. करिअर-व्यवसायाशी संबंधित अडचणी सुटतील. या आठवड्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांसाठीही आठवडा चांगला असेल आणि खूप दिवसांपासून रखडलेली कामं वेळेत पूर्ण होतील.
कुंभ राशीसाठी आठवडा साधारण जाईल. करिअर आणि व्यवसायासाठी मात्र आठवडा चांगला असेल, पण नोकरी करणाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. जमीन-मालमत्तेवरून सुरू असलेले वाद मिटतील. धंद्याशी संबंधित लोकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी.
मीन राशीसाठी आठवडा संमिश्र राहील. चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो, तरी कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन-मालमत्ता किंवा गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जोडीदारासोबत आठवडा चांगला जाईल, पण घरात वाद झाल्याने मानसिक ताण जाणवू शकतो.