गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:22 IST

बजेट रेंजमध्ये सॅमसंगचा धमाका, 20 हजारांहून कमी किंमतीत नवा फोन दाखल

बजेट रेंजमध्ये सॅमसंगचा धमाका, 20 हजारांहून कमी किंमतीत नवा फोन दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सॅमसंगने त्यांच्या बजेट सेगमेंटमध्ये आणखी एक नवा फोन उतरवला आहे. काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झालेल्या या स्मार्टफोनचं नाव आहे Samsung Galaxy A07s. कंपनीच्या वेबसाईटवर हा फोन सध्या तीन कलर ऑप्शनमध्ये मिळतोय. कंपनीने हे नवीन हँडसेट दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांत बाजारात आणलं आहे.

हा नवा हँडसेट दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये आणला गेलाय, 4GB+64GB आणि 4GB+128GB. 4GB+64GB व्हेरिएंटची किंमत JOD 119 म्हणजे साधारण 16,000 रुपये इतकी ठेवण्यात आलीय, तर टॉप-एंड 4GB+128GB व्हेरिएंटसाठी JOD 149 म्हणजे साधारण 20,000 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या हा फोन जॉर्डनमध्ये सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वॉयलेट या तीन कलर्समध्ये हा फोन घेता येईल. म्हणजेच जॉर्डनमधल्या ग्राहकांना आता कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरूनच हा फोन ऑर्डर करता येणार आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी+ पीएलएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलाय. स्क्रीनला 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 16.7 मिलियन कलर्सचा सपोर्ट मिळतो. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आलंय, म्हणजे रोजच्या वापरात धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून फोनचं संरक्षण होणार आहे.

प्रोसेसरच्या बाबतीत या डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G99+ चिपसेट बसवण्यात आलाय. यात सहा एफिशिएंसी कोर 2.0GHz वर चालतात, तर दोन परफॉर्मेंस कोर 2.2GHz पर्यंतचा पीक क्लॉक स्पीड देऊ शकतात. म्हणजे रोजची हलकी कामं एफिशिएंसी कोरवर होतील आणि जड कामांसाठी परफॉर्मेंस कोर जास्तीचा स्पीड देतील. फोनला 4GB रॅम आणि 128GB पर्यंतचं इंटरनल स्टोरेज मिळतंय.

कॅमेराच्या बाबतीत सॅमसंगने या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिलाय. यात ऑटोफोकस आणि 10x पर्यंत डिजिटल झूम असलेला 50-मेगापिक्सलचा (f/1.8) प्रायमरी कॅमेरा आहे, सोबतीला 2-मेगापिक्सलचा (f/2.4) रियर डेप्थ सेंसरही देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा (f/2.0) कॅमेरा बसवण्यात आलाय. हा फोन 1080p रिझॉल्युशनमध्ये 30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

बॅटरी बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलीय, जी यूएसबी टाइप-सी पोर्टवरून चार्ज करता येते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ