गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:20 IST

रूम फ्रेशनर वापरताय? 'या' गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक!

घरात, ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये सुगंध पसरवण्यासाठी वापरला जाणारा रुम फ्रेशनर आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो, हे जाणून घ्या.

रूम फ्रेशनर वापरताय? 'या' गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक! छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

घरात, ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये छान वास दरवळावा यासाठी बरेच जण रुम फ्रेशनर वापरतात. याचा सुगंध मन शांत करतो आणि आनंदी वाटायला मदत करतो. आजूबाजूला चांगला वास असला की कामातही मन लागतं. घाण किंवा दुर्गंधी घालवण्यासाठीही रुम फ्रेशनरचा वापर केला जातो. पण याच्या वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, हे फार कमी जणांना माहीत असतं. विशेषतः बंद खोलीत रुम फ्रेशनरचा जास्त वापर केल्यास श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. त्यामुळे रुम फ्रेशनर वापरण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

रुम फ्रेशनरमध्ये सुगंध देणारे काही केमिकल घटक असतात, जे आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यात व्होलॅटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड्स (VOCs) आणि डायक्लोरोबेंझिनसारखी रसायनं असतात. ही रसायनं हवा ताजी वाटावी यासाठी वापरली जातात. स्प्रे केल्यानंतर ही रसायनं काही वेळ हवेत तरंगत राहतात आणि श्वासावाटे नाकातून शरीरात जातात. याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होऊ शकतो. जास्त प्रमाणात संपर्कात आल्यास डोळे, नाक आणि घशात जळजळ होऊ शकते. काहींना डोकेदुखी, चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटणं असा त्रासही जाणवू शकतो. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आधीच श्वासासंबंधी त्रास असणाऱ्यांना रुम फ्रेशनरचा जास्त फटका बसू शकतो.

रुम फ्रेशनरचा जास्त वापर श्वासाच्या समस्या आणखी वाढवू शकतो. आधीपासून दमा किंवा इन्फेक्शनचा त्रास असणाऱ्यांना रुम फ्रेशनरच्या सुगंधामुळे खोकला, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास वाढू शकतो. स्प्रे केल्यानंतर लगेच त्याच जागी जास्त वेळ थांबणं चांगलं मानलं जात नाही. लहान खोल्यांमध्ये तर याचा वापर आणखी कमी ठेवायला हवा. रुम फ्रेशनर वापरल्यावर खोलीची खिडकी उघडी ठेवावी, म्हणजे नैसर्गिक बाहेरची हवा आत येईल आणि खोलीत हवा खेळती राहील. यामुळे हानिकारक रसायनांचा खोलीतील परिणाम कमी होण्यास मदत होते.

रुम फ्रेशनर वापरताना काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. याचा जास्त वापर टाळावा. चेहरा, डोळे किंवा त्वचेवर याचा स्प्रे थेट मारू नये. जिथे जेवण बनवलं जातं, त्या स्वयंपाकघरासारख्या ठिकाणी रुम फ्रेशनर वापरणं टाळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, रुम फ्रेशनर वापरल्यानंतर सतत खोकला येत असेल, तर त्याचा वापर लगेच थांबवावा. या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास रुम फ्रेशनरमुळे होणारा आरोग्याचा धोका बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ