Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
ऋषीपंचमीनिमित्त सप्तर्षींच्या स्मरणाचा हा दिवस, त्यानिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा.
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यंदा हा सण १५ सप्टेंबरला येत आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी सप्तर्षींची पूजा केली जाते. समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महान ऋषींचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
प्राचीन काळी भारतातील महान ऋषींनी केलेले कार्य आणि दिलेले ज्ञान यासाठी आभार मानण्याचा हा दिवस मानला जातो. अनेक स्त्रिया या दिवशी व्रत करतात. अनावधानाने घडलेल्या चुका किंवा रजस्वला दोष दूर व्हावेत, हा या व्रतामागचा हेतू सांगितला जातो. या दिवशी जंगलात उगवणाऱ्या भाज्यांची एकत्र मिक्स भाजी बनवण्याचीही पद्धत आहे. हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जाणारा हा सण साजरा करताना नातेवाईकांना खास शुभेच्छा पाठवल्या जातात.
ऋषीपंचमीनिमित्त पूजेवेळी "कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः। जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः।। गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।" हा श्लोक म्हटला जातो. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सात ऋषींचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण अशा संस्कृतीत जन्मलो आहोत जी विद्वान आणि क्षमता असलेल्या लोकांभोवती आहे, संरक्षित आहे आणि त्यांचे नेतृत्व करत आहे.
वेदांमध्ये ऋषी हा शब्द वारंवार येतो आणि आता तो एक सर्वसाधारण शब्द बनला आहे. मंत्र-द्रष्टा, म्हणजेच विचारांचा द्रष्टा, अशी ऋषी या शब्दाची व्याख्या सांगितली जाते. ज्ञान, बुद्धी आणि परोपकाराचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सात ऋषींच्या आशीर्वादाने आयुष्यात वाढ, समृद्धी आणि आनंद मिळतो, अशी श्रद्धा आहे. उपवास आणि प्रार्थना केल्याने स्वतःला आणि कुटुंबाला बळ मिळते, असेही मानले जाते.
ऋषीपंचमीनिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा पुढीलप्रमाणे आहेत.
तुमचे जीवन ज्ञान, बुद्धी, आनंद, यश आणि सुसंवादाने परिपूर्ण असो, हीच माझी ऋषीपंचमीनिमित्त सदिच्छा. ऋषीपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सप्त ऋषींचे आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहोत, ऋषीपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
ऋषीपंचमीचे व्रत केल्याने वाईटाकडून धार्मिकतेकडे वाटचाल करण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. सप्तऋषी आत्म्याला पवित्र ज्ञानाने भरून टाकोत, ऋषीपंचमीच्या शुभेच्छा!
ऋषीपंचमीच्या शुभ दिनी ज्ञानी आणि परोपकारी ऋषींच्या आदर्शांचे स्मरण करून त्यांच्या कृपेने जीवन समृद्ध आणि आनंदी होवो, ऋषीपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
ज्ञानाचा गौरवशाली इतिहास लाभल्याबद्दल या खास दिवशी कृतज्ञ राहूया, ऋषीपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भारत ही ऋषी-मुनींची भूमी आहे. ऋषीपंचमीच्या या शुभप्रसंगी या ऋषींच्या आशीर्वादासाठी त्यांचे आभार मानूया, ऋषीपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!