गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:42 IST

रिमोट बंद पडलाय? नवीन घेण्याआधी मोबाईल कॅमेऱ्याने असं करा 10 सेकंदात चेकिंग

टीव्हीचा रिमोट अचानक चालेनासा झाला की आपण लगेच नवीन आणायचा विचार करतो, पण त्याआधी घरातल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने एक सोपी टेस्ट करून बघता येते.

रिमोट बंद पडलाय? नवीन घेण्याआधी मोबाईल कॅमेऱ्याने असं करा 10 सेकंदात चेकिंग छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टीव्ही बघताना अचानक रिमोट काम करायचं बंद होतं, तेव्हा आपण बटणं जोरजोरात दाबतो, कधी हातावर आपटूनही बघतो. तरी रिमोट चालत नसेल तर लगेच वाटतं की तो खराब झाला आणि मग एकतर दुरुस्तीला टाकतो किंवा नवीन रिमोट आणतो. पण एवढी घाई करायची गरज नाही, कारण खिशातला मोबाईलच सांगू शकतो रिमोटमध्ये नेमकी काय गडबड झाली आहे.

हे समजून घेण्याआधी रिमोट नेमका कसं काम करतो ते बघावं लागेल. घरातले टीव्ही, एसी किंवा सेट टॉप बॉक्सचे रिमोट इन्फ्रारेड नावाच्या टेक्नॉलॉजीवर चालतात. रिमोटच्या पुढच्या बाजूला एक छोटा बल्ब असतो. बटण दाबलं की या बल्बमधून प्रकाश बाहेर पडतो, तो टीव्हीपर्यंत पोहोचतो आणि टीव्हीला कळतं की चॅनल बदलायचा आहे की आवाज वाढवायचा आहे. हा प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण मोबाईलच्या कॅमेऱ्याला मात्र तो व्यवस्थित दिसतो. याच गोष्टीचा वापर करून रिमोटमधली गडबड शोधता येते.

ही ट्रिक करायला फार वेळ लागत नाही. आधी मोबाईलचा कॅमेरा सुरू करायचा. मग रिमोटचा पुढचा भाग, जिथे तो छोटा काचेसारखा बल्ब असतो, तो कॅमेऱ्यासमोर धरायचा. त्यानंतर रिमोटचं कोणतंही एक बटण दाबून धरायचं आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे बघायचं.

जर स्क्रीनवर त्या बल्बमधून चमकणारा पांढरा किंवा जांभळा प्रकाश दिसला, तर समजायचं की रिमोट व्यवस्थित आहे आणि त्यातून सिग्नल निघतोय. म्हणजे प्रॉब्लेम रिमोटमध्ये नसून टीव्हीच्या सेन्सरमध्ये असू शकतो. प्रकाश खूपच कमी किंवा मंद दिसत असेल, तर रिमोटची बॅटरी संपत आल्याचं समजायचं आणि नवीन बॅटरी टाकली की रिमोट पुन्हा चालू शकतो. पण बटण दाबूनही स्क्रीनवर अजिबात प्रकाश दिसला नाही, तर दोन शक्यता असतात, एकतर बॅटरी पूर्ण संपली आहे किंवा रिमोटचं आतलं सर्किट खराब झालं आहे.

कधी कधी बॅटरी चांगली असूनही रिमोट चालत नाही. याचं कारण म्हणजे रिमोटमध्ये बॅटरी बसवतो त्या जागी आतमध्ये स्प्रिंग असतात आणि त्यांच्यावर धूळ बसते किंवा गंज लागतो. त्यामुळे बॅटरी असूनही करंट पुढे जात नाही. त्यामुळे नवीन बॅटरी टाकण्याआधी एकदा तो भाग उघडून बघावा आणि कोरड्या कापडाने हलक्या हाताने साफ करून घ्यावा. धूळ काढल्यानंतर परत बॅटरी लावून बघितलं की बऱ्याचदा रिमोट पुन्हा सुरू होतो. त्यामुळे पुढच्या वेळी रिमोटने दगा दिला, तर लगेच दुकानात न जाता आधी मोबाईलचा कॅमेरा काढून हा दहा सेकंदांचा प्रयोग करून बघावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ