Ranveer Singh New Brand Ambassador: 'धुरंधर'नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज, बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसेडर
BMW इंडियाने नवी 7 सीरिज रेंज लॉन्च करतानाच रणवीर सिंह यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर केले.
नवी दिल्लीत आज BMW इंडियाने एक खास आणि लक्षवेधी इव्हेंट आयोजित केला होता. हा एक लँडमार्क लॉन्च होता, जो समर्पणाला दिलेली एक खास आदरांजली मानला जातो. या इव्हेंटमध्ये दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या दोन मोठ्या नावांची उपस्थिती पाहायला मिळाली, एक आधुनिक लक्झरीचं प्रतिनिधित्व करणारं तर दुसरं सिनेमॅटिक एक्सलन्सच्या शिखराचं.
भारताचा अल्टिमेट शोमॅन म्हणून ओळखला जाणारा आणि अत्यंत एनर्जेटिक असलेला अभिनेता रणवीर सिंह यावेळी उपस्थित होता. या इव्हेंटमध्येच त्याला BMW इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर करण्यात आलं. या सहयोगामुळे 7 सीरिजचा दबदबा, तिची ओळख आणि समर्पण यांना एक दमदार आणि आधुनिक अंदाजाची जोड मिळते, असं बोललं जातंय.
याच ग्रँड इव्हेंटमध्ये BMW इंडियाने देशात आपली बहुप्रतीक्षित नवी 7 सीरिज रेंज लॉन्च केली. या गाडीचं अनावरण खुद्द ब्रँड अॅम्बेसेडर रणवीर सिंहच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्ताने दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या दोन दिग्गजांचा एक आयकॉनिक मिलाफ पाहायला मिळाला.
रणवीर सिंह हा त्याच्या बेमिसाल ऑरा आणि मॅग्नेटिक प्रेझेन्ससाठी ओळखला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याची एन्ट्री या खास लॉन्चला एका संस्मरणीय क्षणात बदलणारी ठरली. त्याचा लार्जर-दॅन-लाईफ पर्सोना आणि BMW च्या फ्लॅगशिप 7 सीरिजचं कमांडिंग रूप एकत्र बघणं हा स्वतःमध्येच वेगळा अनुभव होता.
त्याच्या उपस्थितीमुळे हा लॉन्च केवळ शानदार बनला नाही, तर त्याची मिस न करता येणारी खास एनर्जीसुद्धा सगळ्यांना अनुभवायला मिळाली. या दोन मोठ्या नावांचं एकत्र येणं म्हणजे एक्सलन्स, महत्त्वाकांक्षा आणि काहीतरी असामान्य, वेगळं करण्याच्या इच्छेचा एक उत्सवच होता, असं म्हटलं जातंय.
ग्राहकांसाठी सांगायचं झालं तर BMW ची ही फ्लॅगशिप सेडान पेट्रोल तसंच पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल. यासोबतच पूर्णपणे इलेक्ट्रिक परफॉर्मन्स मॉडेल BMW i7 M70 देखील भारतातल्या ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही आतापर्यंतची सगळ्यात शक्तिशाली BMW 7 सीरिज ठरणार आहे.
या गाड्यांची बुकिंग BMW इंडियाच्या डीलरशिपवर करता येईल, तर डिलिव्हरी ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे.