गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:25 IST

पुण्यात कात्रजमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, परीक्षेच्या तणावाचा संशय

कात्रज भागातील नॅन्सी लेक होम सोसायटीत 21 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून तिच्या भावाने परीक्षेच्या तणावाचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

पुण्यात कात्रजमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, परीक्षेच्या तणावाचा संशय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीत एका 21 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव आदी माया शेखर रेड्डी असे असून ती मूळची तेलंगणातील तिरूमलंगरी, हैदराबाद येथील रहिवासी होती. ती कात्रज भागात आपल्या भावासोबत राहत होती आणि एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती.

सोसायटीत एका तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर तरुणी गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आजूबाजूच्या नागरिकांकडूनही घटनेबाबत माहिती घेतली.

घटनेच्या वेळी तिचा भाऊ डॉ. आदी अदीम शेखर रेड्डी घटनास्थळी हजर होता. त्याने पोलिसांना सांगितले की, आदी माया एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती आणि कात्रजमधील फ्लॅटमध्ये त्याच्यासोबतच राहत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या आणि त्यामुळे ती तणावाखाली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. परीक्षेच्या ताणातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज भावाने व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेत कोणावरही संशय नसल्याचे भावाने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातच एका वेगळ्या घटनेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव प्रथमेश देशमुख असून तो मूळचा परंडा येथील रहिवासी होता आणि पुण्यातील नवी पेठ भागात भाड्याच्या घरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. प्राथमिक माहितीनुसार, प्रथमेशने आत्महत्या केली असून त्याच्यावर असलेल्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या कर्जाच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

घटनास्थळी दोन पानी सुसाइड नोट सापडल्याची माहिती आहे. पोलीस उपायुक्त हृषिकेश रावले यांनी सांगितले की, या नोटमध्ये प्रथमेशने ज्या 18 ते 19 व्यक्तींकडून पैसे घेतले होते त्यांची नावे आणि तपशील नमूद आहेत, तसेच त्या व्यक्तींना किती रक्कम परत केली होती याचीही नोंद आहे. मात्र इतक्या व्यक्तींकडून पैसे घेण्यामागचे नेमके कारण काय होते आणि त्याच्यावर काही दबाव होता का, याचा तपास सुरू असून यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ