Flipkart Big Billion Days 2026: फोन, टीव्हीसह अनेक वस्तूंवर स्वस्ताई कधीपासून सुरू होणार
फ्लिपकार्टने आपल्या सगळ्यात मोठ्या शॉपिंग सेलची, म्हणजे बिग बिलियन डेज २०२६ सेलची तारीख अखेर जाहीर केली आहे. या ई-कॉमर्स कंपनीचा हा सेल भारतात ९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस, फ्लिपकार्ट ब्लॅक आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा एक दिवस आधीच मिळणार आहे. म्हणजे हे ग्राहक ८ ऑक्टोबरपासूनच सेलच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. इतर सर्वसामान्य ग्राहकांना मात्र ९ ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल.
याशिवाय फ्लिपकार्टने सेलसाठी एका खास मायक्रोसाइटचे लाइव्हस्ट्रीमही सुरू केले आहे, ज्यावर बँक डिस्काउंट, स्पेशल डील्स आणि इतर ऑफर्सची माहिती दाखवली जात आहे. म्हणजे सेल सुरू होण्याआधीच ग्राहकांना कोणत्या बँकांवर सूट मिळणार आणि कोणत्या खास डील्स असणार, याची झलक या मायक्रोसाइटवरून मिळत आहे. यंदाच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये फोन आणि टीव्हीपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वापराच्या उपकरणांपर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंवर चांगल्या डील्स मिळणार असल्याचे कंपनीने संकेत दिले आहेत.
गणपतीपासून सणांची जोरदार सुरुवात होते आणि याच काळात बऱ्याच जणांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतात. नेमकं याच वेळी मोठमोठे सेलही लागतात, त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा घेता येतो. सणासुदीच्या या काळातच फ्लिपकार्टचा हा सेल येत असल्याने ग्राहकांची खरेदी आणि सेलमधील सवलती यांचा मेळ बसतो.
क्रेडिट कार्डवरील सवलतीबद्दल बोलायचं झालं, तर बिग बिलियन डेज २०२६ सेल दरम्यान ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना १०% पर्यंत इन्स्टंट सूट मिळू शकते. याशिवाय फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनाही १०% सूट दिली जाणार आहे. तसेच फ्लिपकार्टच्या सुपर मनीचा वापर करून केलेल्या पहिल्या व्यवहारावर १०% कॅशबॅकसुद्धा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना नक्कीच चांगला फायदा होणार असून इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना याचा लाभ घेता येईल.
सेल दरम्यान कंपनी वेगवेगळे खास इव्हेंट्स आणि डील्सही सादर करणार आहे. यामध्ये प्राइस क्रॅश, बीबीडी स्पेशल्स, टिक टॉक डील्स, ब्रँड अवर्स, डबल डिस्काउंट्स आणि रश अवर्स अशा वेगवेगळ्या ऑफर्समध्ये विविध वस्तू उपलब्ध असतील. मात्र या ऑफर्समध्ये नेमकी कोणती उत्पादने असतील आणि किती सूट मिळेल, याबद्दलचा तपशील अजून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहक सध्या नेमकी किती सूट मिळणार याच्या शोधात असतील आणि त्याचा फायदा फ्लिपकार्टलाही नक्कीच होईल.