गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:01 IST

जेवणातील 'हे' पदार्थ वाढवतात किडनी स्टोनचा आणि किडनीच्या आजारांचा धोका

रोजच्या आहारातील काही सवयींमुळे किडनीवर ताण येऊन मुतखडा आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात, तज्ज्ञांनी सांगितलेले हे पदार्थ टाळणे गरजेचे आहे.

जेवणातील 'हे' पदार्थ वाढवतात किडनी स्टोनचा आणि किडनीच्या आजारांचा धोका
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

शरीरातील रक्त शुद्ध करणे आणि लघवीवाटे विषारी घटक बाहेर टाकणे, ही किडनीची सगळ्यात महत्त्वाची कामं. पण खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कमी पाणी पिण्यामुळे किडनी खराब होते किंवा मुतखडा होतो, असा एक सर्वसाधारण समज असतो. पण फक्त पाणी कमी पिणे हेच एकमेव कारण नाही. आनुवंशिकता, चयापचयातील (मेटाबॉलिझम) बिघाड आणि आहारातील घटकांचे असंतुलन यामुळेही किडनीचे आजार वाढू शकतात. आहारातील काही छोट्या-छोट्या गोष्टी किडनीला हळूहळू इजा पोहचवत असतात, त्यामुळे रोजच्या जेवणात कोणते पदार्थ टाळावेत, हे समजून घेणं गरजेचं आहे.

सगळ्यात आधी बोलायचं झालं तर मिठाच्या अतिसेवनाबद्दल. अनेकांना जेवणात आधीच मीठ असूनही वरून पुन्हा मीठ घेण्याची सवय असते. ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरते. शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढलं की किडनीत खडे तयार व्हायला सुरुवात होते, कारण जास्त सोडियममुळे लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे रोजच्या जेवणात मीठ शक्य तितकं कमी आणि गरजेपुरतंच वापरावं. पॅकेज्ड स्नॅक्स, इन्स्टंट फूड, विविध सॉस, लोणचं, प्रोसेस्ड मीट आणि हॉटेलातलं जेवण यांमध्येही मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, हे लक्षात ठेवायला हवं.

दुसरा घटक म्हणजे लाल मांस. मांस आणि इतर प्राणिज प्रथिनं जास्त प्रमाणात खाल्ली की किडनीच्या आजारांचा धोका वाढतो, कारण त्यामुळे लघवीचं रासायनिक संतुलन बिघडून किडनीत खडे तयार होतात. म्हणून प्रथिनं पूर्णपणे बंद न करता योग्य प्रमाणातच घ्यावीत. लाल मांस किंवा शिळे मासे, चिकन, मटण खाण्याऐवजी ताजे आणि संतुलित पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

तिसरा मुद्दा साखरेचा. अतिरिक्त साखर किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानेही आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. गोड पेयांमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं आणि ही पेयं लघवीत खडे तयार करणाऱ्या घटकांना चालना देतात. साखरेच्या अतिसेवनामुळे लघवीतील कॅल्शियम आणि युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि त्यातून खडे तयार होतात. त्यामुळे कृत्रिम गोड पेयं, सोडा आणि गोड सरबतं शक्यतो टाळावीत.

चौथा घटक म्हणजे ऑक्झालेटचं प्रमाण जास्त असणारे पदार्थ. पालक, बीट, ड्रायफ्रूट्स आणि काही वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये ऑक्झालेट मोठ्या प्रमाणात असतं. मात्र हे पदार्थ एकदम खाणं बंद न करता हळूहळू आहारातून कमी करावेत. याशिवाय किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर पाणी पिणं, आहारात योग्य बदल करणं, नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे.

टीप - ही माहिती केवळ सर्वसाधारण जनजागृतीसाठी दिली असून, कोणत्याही आजारावरील उपचाराचा दावा यात करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ