मोहिनी मालिकेत ट्विस्ट, रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, लग्नाच्या पुराव्यांवरून गोंधळ
कलर्स मराठीवरील मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी या मालिकेत आरके आणि मोहिनीच्या रिसेप्शनमध्ये दीपाच्या एन्ट्रीने मोठं नाट्य रंगणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. या मालिकेच्या कथेत आता एक मोठं आणि नाट्यमय वळण येणार असल्याचं समजतं. आरके आणि मोहिनी यांच्या बहुचर्चित रिसेप्शन सोहळ्यात प्रेम, रोमँटिक डान्स आणि धमाल परफॉर्मन्स असे रंगारंग क्षण असतीलच, पण त्याचबरोबर एक हाय-व्होल्टेज ड्रामाही रंगणार आहे. या सोहळ्यात दीपाची अचानक होणारी एन्ट्री कथेला पूर्णपणे वेगळं वळण देणार आहे.
आरके आणि मोहिनीच्या ग्रॅंड रिसेप्शनची तयारी सध्या जोरात सुरू आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार असून त्यासाठी खास सजावटही करण्यात आली आहे. पाहुण्यांची गर्दी आणि उत्साहाचं वातावरण या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. या रिसेप्शनमध्ये आरके आणि मोहिनीचा रोमँटिक डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोबतच शालिनी आणि महेंद्रचा गोड डान्स परफॉर्मन्स आणि पिंकी-बंटीचा जोरदार डान्स ॲक्टही रंगणार आहे. त्यामुळे हा रिसेप्शन सोहळा एकूणच मनोरंजनाने भरलेला असणार आहे.
हे सगळे आनंदाचे क्षण सुरू असतानाच रिसेप्शनमध्ये दीपाची एकाएकी एन्ट्री होणार आहे. आरके आणि मोहिनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करण्याच्या तयारीत असतानाच दीपाच्या आगमनाने पूर्ण वातावरण बदलून जाणार आहे. दीपा थेट आरके आणि मोहिनीच्या नात्यावर आणि त्यांच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. एवढंच नाही, तर ती लग्नाचे पुरावे मागणार असल्याने रिसेप्शनमध्ये मोठी खळबळ उडणार आहे.
दीपाच्या या मागणीमुळे रिसेप्शन सोहळ्यात संशयाचं वातावरण तयार होणार आहे. जुन्या दस्तऐवजांपासून काही महत्त्वाच्या पुराव्यांपर्यंत अनेक गोष्टी आता समोर येण्याची शक्यता आहे. एकापाठोपाठ एक होणारे खुलासे आणि धक्कादायक माहिती यामुळे आरके आणि मोहिनीसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. आनंदात सुरू झालेला हा रिसेप्शन सोहळा त्यामुळे नाट्यमय वळणावर येऊन ठेपणार आहे.
दीपाच्या या एन्ट्रीनंतर आरके आणि मोहिनी या परिस्थितीला कसं तोंड देणार, लग्नासंदर्भातील पुरावे नेमके काय आहेत आणि जुन्या दस्तऐवजांमधून कोणतं रहस्य बाहेर येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत. प्रेम, नातेसंबंध आणि रहस्य यांनी भरलेली ही मालिका आता या हाय-व्होल्टेज ड्रामामुळे आणखी रंजक होणार आहे. आरके आणि मोहिनीच्या या फिल्मी प्रेमकहाणीला पुढे कोणतं नवं वळण मिळतं, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.