फ्रॉन्क्सपासून ग्रँड विटारापर्यंत! लवकरच येणार मारुतीच्या 5 फेसलिफ्ट कार, पाहा कोणती बनणार तुमची फेवरेट
मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, एर्टिगा, वॅगनआर आणि इन्विक्टो या पाच लोकप्रिय गाड्यांना लवकरच फेसलिफ्ट अपडेट मिळण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकीने अलीकडेच बलेनो आणि ब्रेझा या गाड्यांना फेसलिफ्ट अपडेट दिले. या दोन गाड्यांचे अपडेट झाल्यानंतर आता कंपनीचे लक्ष तिच्या इतर लोकप्रिय गाड्यांकडे वळले आहे. फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, एर्टिगा, वॅगनआर आणि इन्विक्टो या पाच मॉडेल्सना पुढच्या काळात फेसलिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कार घ्यायचा विचार करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते.
फ्रॉन्क्सच्या नव्या मॉडेलमध्ये डिझाइनसोबत फीचर्समध्येही बदल होण्याची शक्यता आहे. यात Level 2 ADAS, Autonomous Emergency Braking, Lane Keep Assist, Adaptive Cruise Control आणि Forward Collision Warning हे फीचर्स मिळू शकतात. सध्या असलेला 360-डिग्री कॅमेरा नव्या मॉडेलमध्येही तसाच राहण्याची शक्यता आहे. इंजिनच्या बाबतीत 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z-Series पेट्रोल इंजिन मिळू शकते, जे 83 bhp आणि 112 Nm टॉर्क देते. सध्याच्या CNG पर्यायासोबतच नव्या Series-Hybrid टेक्नोलॉजी येण्याचीही चर्चा आहे.
ग्रँड विटाराला 2026 च्या सणासुदीत किंवा 2027 च्या सुरुवातीला अपडेट मिळू शकते. बाहेरून पाहता या गाडीला नवीन ग्रिल, नवीन बंपर, LED हेडलॅम्प आणि 17-इंच अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. केबिनच्या आत 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, प्रीमियम ऑडिओ सिस्टीम आणि पॉवर्ड टेलगेट यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात. याशिवाय Level 2 ADAS हेही या गाडीचे मोठे आकर्षण ठरू शकते.
एर्टिगाच्या फेसलिफ्टमध्ये मोठे यांत्रिक बदल करण्याऐवजी डिझाइन आणि फीचर्सवर जास्त भर दिला जाऊ शकतो. या गाडीत नवीन टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि अपडेटेड बाहेरचे रूप मिळण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असलेले पेट्रोल, CNG आणि मॅन्युअल-ऑटोमॅटिक हे पर्याय फेसलिफ्ट मॉडेलमध्येही पुढे कायम राहू शकतात.
टेस्टिंगदरम्यान रस्त्यावर दिसलेल्या वॅगनआरमुळे नव्या अपडेटची चर्चा सुरू झाली आहे. या गाडीच्या हेडलॅम्प, ग्रिल, बंपर आणि टेललॅम्पमध्ये बदल अपेक्षित आहेत. यातील सर्वात मोठे अपडेट म्हणजे 1.2-लिटर Z12E पेट्रोल इंजिन असू शकते. सध्या असलेला CNG हा पर्यायही या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
प्रीमियम MPV असलेल्या इन्विक्टोलाही 2027 मध्ये फेसलिफ्ट मिळू शकते. या गाडीत नवीन ग्रिल, 19-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन रंगांसोबतच मोठी टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, Level 2 ADAS, JBL ऑडिओ सिस्टीम, व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस चार्जिंग यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. सध्या या गाडीत असलेले 2.0-लिटर पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेन फेसलिफ्ट मॉडेलमध्येही तसेच कायम राहण्याची अपेक्षा आहे.