गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:25 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन नव्या पिढीला दिशा देणारा - हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

राजुरा, जिवती व कोरपना येथे ध्वजारोहण; सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाई कामगारांचा सत्कार, विद्यार्थ्यांना नोटबुक्स व लाडूचे वाटप.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन नव्या पिढीला दिशा देणारा - हंसराज अहीर यांचे प्रतिपादन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

निजामांच्या जुलमी राजवटीतून सुटका झाल्याचा हा दिवस, म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, सर्वांसाठी मोठा उत्सव असल्याचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाही जन्मदिवस आजच असल्याचे नमूद करत, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रोध्दाराच्या कामात मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. या दोघांचे देशसेवेचे कार्य समस्त देशवासीयांना नेहमी प्रेरणा देत राहील, तसेच मुक्तिसंग्राम दिनाचा हा सोहळा आजच्या आणि पुढील पिढ्यांसाठी सतत दिशादर्शक ठरेल, असे अहीर यांनी ध्वजारोहण प्रसंगी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा, जिवती आणि कोरपना येथे हंसराज अहीर यांच्या हातून ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, अॅड. संजय धोटे, नगराध्यक्ष निलेश ताजणे, अरूण मस्की, राजु घरोटे, शिवाजी सेलोकर, रामा मोरे, सतिश धोटे, अॅड. प्रशांत घरोटे, बाळनाथ वडस्कर, संजय पावडे, विजयराव बावणे, महादेव तपासे, लखन अडबाले, किशोर बावणे, आबिद अली, चिताडेताई, वर्षाताई लांडगे, जयाताई धारणकर, सुरेखाताई मुके, आशाताई पढोळे, लक्ष्मीताई कुळमेथे, येरेकरताई, वाघुजी गेडाम, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, महादेव जयस्वाल, राजेश राठोड, गोपीनाथ चव्हाण, नारायण हिवरकर, सतिश उपलेंचवार, कवडू जरीले, विशाल गज्जलवार, वसंत बहीरे, शशीकांत आडकीने, प्रमोद कोडापे, अरूण मडावी, पुरूषोत्तम भोंगळे, सतिश बेतावार, राहुल सुर्यवंशी, तिरूपती कन्नाके, पुनम तिवारी, गौतम यादव, अमोल आसेकर, अनिल कौरासे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाषणात हंसराज अहीर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देशाने सर्वच क्षेत्रांत अभूतपूर्व विकास पाहिला आहे. मोदींच्या राष्ट्रोध्दारक कामाचे गौरवाने वर्णन करत, त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भाजपने आयोजित केलेले सेवा संकल्प अभियान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

जिवती तालुक्यातील शेतजमिनी आणि वसाहती अनेक वर्षांपासून वनक्षेत्राच्या कचाट्यात अडकल्या होत्या, त्यामुळे या तालुक्यातील विकासकामे खुंटली होती आणि नागरिक व शेतकरी विकासाच्या सुविधांपासून दूर राहिले होते, असे अहीर यांनी सांगितले. राज्य सरकारने हा अन्याय दूर करत हजारो हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अजूनही अनेक समस्या शिल्लक असून त्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानिक तत्त्वांचे पालन करत देशातील लोकांना न्याय दिला असल्याचे अहीर म्हणाले. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, देशांतर्गत सुरक्षा तसेच राष्ट्रीय सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी देशवासीयांचा स्वाभिमान जागवला आणि जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली, असे ते म्हणाले. एवढे मोठे नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने लाभणे हे देशाचे मोठे भाग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींनी शेकडो योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला असून, आयुष्यमान भारत योजना, हर घर जल योजना आणि आवास योजनांनी देश घडवला आहे, असे अहीर यांनी सांगितले. दुर्धर आजारांच्या औषधांच्या किमती कमी करून कोट्यवधी लोकांना न्याय दिला आणि जीएसटी कमी करून सर्व घटकांना दिलासा दिला, हीच प्रधानमंत्र्यांची मोठेपणाची खरी ओळख असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून राजुरा, कोरपना आणि जिवतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच राजुरा आणि कोरपना येथील सफाई कामगारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ