गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:25 IST

ग्रामपंचायतींनी स्व_उत्पन्नातून गावाचा विकास साधावा

सावली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांचे आवाहन

ग्रामपंचायतींनी स्व_उत्पन्नातून गावाचा विकास साधावा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गाव चालवण्यासाठी ग्रामपंचायतींनी शासनाचे अनुदान, अभियान, उपक्रम आणि योजना यांवर कायमस्वरूपी अवलंबून राहू नये. त्याऐवजी गावपातळीवरील विविध प्रकारच्या करांमध्ये योग्य ती वाढ करून स्व_उत्पन्नातून गावाचा विकास साधावा, असे आवाहन सावली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांनी केले. उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांना उद्देशून ते बोलत होते.

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाहीतर्फे "स्व_उत्पन्न वाढ" या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राच्या समारोप कार्यक्रमात कोमलवार बोलत होते.

पंचायत समिती सावलीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस हे प्रशिक्षण पार पडले. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने या दोन दिवसांत ग्रामपंचायतींच्या स्व_उत्पन्न वाढीसाठी अनेक मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, कर आणि कर व्यतिरिक्त इतर स्रोतांची ओळख कशी करून घ्यावी, कर वसुली आणि कर निर्मितीत येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, वर्तणुकीय विज्ञानाच्या तत्त्वांचा वापर करून कर वसुली कशी वाढवता येईल, गाव विकासासाठी निधी कसा उभा करावा, नाविन्यपूर्ण प्रकल्प कोणते राबवता येतील आणि निधी उभारणीचे विविध पर्याय कोणते आहेत, या सर्व मुद्द्यांचा समावेश होता.

याशिवाय शाश्वत संसाधनांसाठी कर अंदाज आणि नियोजन कसे करावे, SWOT विश्लेषण कसे करावे, ग्रामपंचायत विकास आराखड्यात प्रकल्प व्यवस्थापनाची कौशल्ये कशी वापरावीत, स्वामित्व योजना आणि बांधकाम परवानगी प्रक्रिया या विषयांवरही तज्ज्ञांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

प्रशिक्षण अधिक सोपे आणि परिणामकारक व्हावे यासाठी संदर्भ साहित्य, वाचन साहित्य, केस स्टडी, यशोगाथा, PPT सादरीकरणे आणि अभ्यासखेळ यांचा वापर करण्यात आला. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गिरीश धायगुडे आणि व्याख्याता प्रा. पांढरबोढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षक म्हणून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे गुंतिवार सर आणि यशदा पुणे येथून प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षक राजेश डोंगरे यांनी जबाबदारी सांभाळली.

समारोप कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र परिहार, विस्तार अधिकारी राजू परसावार आणि संजीव देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते. सावली आणि मूल पंचायत समितीच्या एकूण ६० ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षणासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ