गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:21 IST

गुड न्यूज! 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री पायल पांडे आई झाली; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री पायल पांडेने मुलाला जन्म दिला असून, सोशल मीडियावर लेकाची पहिली झलक आणि त्याचं नाव जाहीर केलं आहे.

गुड न्यूज! 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री पायल पांडे आई झाली; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठी मालिकाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून अल्पावधीतच घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पायल पांडे आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, आता सोशल मीडियावर तिने आपल्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पायलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आई झाल्यानंतर तिने मुलासोबतचा खास फोटो शेअर करत त्याचं नावही जाहीर केलं आहे. या पोस्टनंतर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर करताना पायलने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या मनातल्या भावना शब्दांत मांडल्या आहेत. ती म्हणते, "हजारो स्वप्नं आणि न बोललेल्या प्रार्थनांच्या दरम्यान तू आमच्यापर्यंत पोहोचलास. आणि अचानक आयुष्य आमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर झालं. एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली, एका नव्या लयीत आमची मनं रमली आणि दोनाचे तीन झालो."

पुढे तिने आपल्या लेकाचं नाव जाहीर केलं. "हा मुलगा आहे. त्याचं नाव वीर आहे. आमचा छोटासा चमत्कार, आमचा सर्वात मोठा आशीर्वाद. या छोट्याशा जीवाने आमच्या जगाला आणखी मोठं आणि सुंदर केलं," असं पायलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आपल्या नव्या आयुष्याबद्दल बोलताना पायलने पुढे लिहिलं की, आता त्यांच्या आयुष्यात झोप न येणाऱ्या रात्री, छोट्या छोट्या हास्याचे क्षण, भरपूर मिठ्या आणि या सुंदर नव्या जगाचा आयुष्यभर शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला आहे. आपलं आयुष्य आता पूर्णपणे बदललं असून, या नव्या टप्प्यात रोजचा दिवस काहीतरी नवीन शिकवणारा असल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. "आमचं तीन जणांचं कुटुंब, आमची नवी सुरुवात आणि कायमचं प्रेम," अशा भावनिक शब्दांत तिने ही पोस्ट शेअर केली.

पायल पांडेच्या या आनंदाच्या बातमीने तिचे चाहतेही सुखावले आहेत. अभिनेत्रीने आपल्या लेकाचं नाव 'वीर' ठेवल्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनीही पायलच्या पोस्टवर कमेंट करत तिचं आणि तिच्या कुटुंबाचं अभिनंदन केलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ