गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:01 IST

मुसळधार पावसातही मनसे कामगार सेनेचा एल्गार सुरू; कामगार बसणार आमरण उपोषणाला

माजरीतील WCL एरियात कंत्राटी चालक आणि कामगारांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाच दिवस झाले तरी प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही.

मुसळधार पावसातही मनसे कामगार सेनेचा एल्गार सुरू; कामगार बसणार आमरण उपोषणाला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

माजरीतल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या एरियात कंत्राटी चालक आणि कामगारांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने सुरू केलेल्या आंदोलनाला आज पाच दिवस पूर्ण झाले. इतके दिवस उलटूनही प्रशासनाने कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि आंदोलन जैसे थे सुरूच आहे.

आज माजरी भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे आंदोलनस्थळाची अवस्था फारच वाईट झाली. संपूर्ण परिसरात पाणी साचलं, आंदोलनस्थळावरचा मंडप, गाद्या आणि इतर सगळं सामान पूर्ण भिजून गेलं. अशा बिकट परिस्थितीतही अंगावर पाऊस झेलत चालक आणि कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी तिथेच ठाम बसून आहेत आणि शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन पुढे रेटत आहेत.

यात आणखी एक गंभीर आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी आंदोलनस्थळी लाईटची कुठलीच सोय करण्यात आलेली नाही. या अंधारामुळे तिथे साप, विंचू, खेकडे आणि उंदीर वावरू लागले असून त्यामुळे कामगारांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गाद्या पावसात पूर्ण भिजल्यामुळे रात्रीच्या वेळी झोपणंही कामगारांना शक्य होत नाही. मागण्या सोडवण्याऐवजी कामगारांना अशा साध्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्यामुळे प्रशासन आणि WCL व्यवस्थापनाविरोधात लोकांमध्ये प्रचंड चीड आणि असंतोष पसरला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी व्यवस्थापनाच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "कामगारांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही." कामगारांचं प्रलंबित वेतन तातडीने द्यावं, वेतनदर योग्य असावा, PF आणि ESIC ची अंमलबजावणी व्हावी, ड्युटी ८ तासांचीच असावी, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावं आणि कंत्राटदारांची मनमानी थांबवावी, या सगळ्या मागण्यांवर लगेच निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

मागण्यांवर अजून काहीच निर्णय न झाल्याने आता हे आंदोलन आणखी आक्रमक वळण घेणार आहे. १२ सप्टेंबरला मनसे कामगार सेनेकडून संबंधित प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन दिलं जाणार आहे, आणि १३ सप्टेंबरपासून दोन कामगार आमरण उपोषणाला बसणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने लगेच सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला नाही, तर हे आंदोलन आणखी उग्र रूप धारण करेल, असा सज्जड इशारा संघटनेने दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ