गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:04 IST

महाबळेश्वर रिसॉर्ट चोरी: मुख्य आरोपी महिलेला दीड वर्षाची शिक्षा, पाच जणांची निर्दोष सुटका

महाबळेश्वरच्या ऑक्सिजन रिसॉर्टमधील चोरी प्रकरणात न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून मुख्य आरोपी महिलेला कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

महाबळेश्वर रिसॉर्ट चोरी: मुख्य आरोपी महिलेला दीड वर्षाची शिक्षा, पाच जणांची निर्दोष सुटका
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाबळेश्वरमधील बहुचर्चित ऑक्सिजन रिसॉर्ट चोरी प्रकरणाचा निकाल अखेर न्यायालयाने दिला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उदय इवरे यांनी हा निकाल दिला असून, या खटल्यातील मुख्य आरोपी महिलेला दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली, तर उर्वरित पाच संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

फिर्यादी विशाल रतिकांत तोषणीवाल हे डॉ. साबणे रोड, महाबळेश्वर येथील रहिवासी असून त्यांच्या विवर रोड, तळदेव येथील ऑक्सिजन रिसॉर्टमध्ये ही चोरी झाली होती. २५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते २८ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या रिसॉर्टमधून तब्बल ८८ प्रकारच्या वस्तू चोरीला गेल्या. यामध्ये गाद्या, बेड, फ्रिज, टीव्ही, एसी, स्वयंपाकघरातील साहित्य, डीव्हीआर, प्रोजेक्टर आणि संगणक यांचा समावेश होता.

आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून ही चोरी केल्याचा आरोप असल्यामुळे महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२५ आणि कोर्ट केस नंबर RCC ३०/२०२५ अंतर्गत BNS कलम ३०५, ३३१(३)(४), ३०६ आणि ३१७(२) नुसार हा गुन्हा नोंदवला गेला होता.

खटल्यादरम्यान एकूण सात साक्षीदारांची उलटतपासणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी क्रमांक १ कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, नालासोपारा, वसई ईस्ट, ठाणे-मुंबई) हिच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करत तिला दोषी ठरवले आणि १ वर्ष ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

याच खटल्यातील आरोपी क्रमांक २ करण दशरथ घाडगे, आरोपी क्रमांक ३ गौतम सुरेश जाधव, आरोपी क्रमांक ४ भूपाल किसन घाडगे, आरोपी क्रमांक ५ राहुल भूपाल गाडगे आणि आरोपी क्रमांक ७ सागर यशवंत घाडगे या सर्वांना, जे सैदापूर, तालुका सातारा येथील रहिवासी आहेत, त्यांना पुरेसे पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने निर्दोष सोडले.

आरोपी क्रमांक ६ आणि ८ अद्याप फरार असून, त्यांच्याविरोधात महाबळेश्वर पोलीस स्टेशनने तीन महिन्यांच्या आत स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाचा तपास महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार आर. एम. काळे यांनी केला. खटल्यात सरकारी वकील म्हणून डी. एम. शेख यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवीसाठी हेड कॉन्स्टेबल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी सहकार्य केले. या तपासात वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ