Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
२६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लक्ष्मी-नारायण योगामुळे मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार असून करिअरमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी तूळ राशीत आधीपासून असलेल्या शुक्रासोबत बुधाची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दोन ग्रहांच्या या एकत्र येण्यामुळे लक्ष्मी-नारायण योग तयार होतो. हा योग चार राशींसाठी खूप शुभ मानला जातोय. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल आणि करिअरमध्येही मोठं यश मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा होणार, ते सविस्तर पाहूया.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असेल. या दिवसांत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. अचानक पैसे येण्याची शक्यताही आहे. आधी कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले प्रोजेक्ट या काळात मार्गी लागतील, आणि मुलांकडूनही एखादी आनंदाची बातमी येऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांनाही हा योग खूप फायद्याचा ठरणार आहे. या काळात त्यांची प्रतिष्ठा वाढेल, आणि व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ असू शकते. अचानक पैसे मिळण्याचे योगही आहेत. एखाद्या प्रयत्नात मोठं यश मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळू शकतो. या राशीच्या लोकांचा मानसिक ताण कमी होईल, आणि परदेश दौऱ्याच्या चांगल्या संधीही येऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठीही हा योग शुभ आहे. त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि सुखसोयी वाढतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते, आणि अचानक पैसे मिळण्याची शक्यताही आहे. हवी असलेली नोकरी मिळू शकते किंवा व्यवसायातून चांगला नफा होईल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामंही या काळात मार्गी लागतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ आणि फायद्याचा ठरणार आहे. या काळात प्रत्येक प्रयत्नात नशिबाची साथ मिळेल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील. पैसे वाढण्याचे संकेत आहेत आणि एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक यात्रेचं नियोजन या राशीचे लोक करू शकतात. त्यांच्या प्रेमजीवनातही यश मिळेल, आणि परदेशात नोकरी मिळण्याचे संकेतही आहेत.