गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

Kia कडून Carens, Clavis सीएनजी आणि कार्निव्हल हायब्रिडचे प्री-बुकिंग सुरू

किया इंडियाने आपल्या तीन-रांगांच्या एमपीव्ही पोर्टफोलिओत सीएनजी आणि हायब्रिड पर्याय आणले असून प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे.

Kia कडून Carens, Clavis सीएनजी आणि कार्निव्हल हायब्रिडचे प्री-बुकिंग सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

किया इंडियाने आपली सगळ्यात जास्त खपणारी गाडी Carens आता फॅक्टरी-फिटेड सीएनजी किटसह आणली आहे. यामुळे कंपनीच्या लाईनअपमध्ये Carens आणि Clavis या दोन्ही सीएनजी गाड्यांचा समावेश झालाय. या दोन्ही गाड्यांचं प्री-बुकिंग आता सुरू झालं असून Carens Clavis CNG एचटीई (HTE) आणि एचटीई (ओ) (HTE (O)) अशा दोन व्हेरिएंटमध्ये मिळणार आहे.

फक्त सीएनजी गाड्याच नाही, तर किया इंडियाने कार्निव्हल लिमोझिन हायब्रिडचंही प्री-बुकिंग एकाच वेळी सुरू केलंय. म्हणजे कंपनीने आपला थ्री-रो एमपीव्ही पोर्टफोलिओ आणखी भक्कम केलाय. Carens CNG, Carens Clavis आणि Carnival Limousine Hybrid या तिन्ही गाड्यांचं बुकिंग किया इंडियाच्या अधिकृत डीलर नेटवर्ककडूनच करता येईल.

Kia Carens CNG मध्ये 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन दिलंय, सोबत सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडलाय. यात फॅक्टरी-फिटेड सीएनजी किट आणि 60 लिटरची टाकी बसवलीय. रिटेल ग्राहकांसाठी ही गाडी प्रीमियम (ओ) जी 1.5 6एमटी ट्रिममध्ये मिळेल, तर बी2बी आणि व्यावसायिक वापरासाठी वेगळा एम-ड्राईव्ह व्हेरिएंटही उपलब्ध असेल. सीएनजीला अनुकूल बनवण्यासाठी कंपनीने इंजिन कॅलिब्रेशन आणि सस्पेंशनमध्ये बदल केलेत, त्यामुळे ही गाडी फॅमिली वापरासाठी आणि कमर्शियल वापरासाठी दोन्हीकडे किफायतशीर पर्याय ठरू शकते.

Kia Carens Clavis CNG मध्येही तेच 1.5 लिटरचं जी1.5 इंजिन आणि सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिलंय, आणि यातही फॅक्टरी-फिटेड 60 लिटरची सीएनजी सिस्टीम आहे. ही जरा प्रीमियम पोझिशनिंगची गाडी असल्यामुळे टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल डिजिटल डिस्प्ले, लेव्हल 2 एडीएस, सहा एअरबॅग्ज, कनेक्टेड एलईडी लायटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफ असे फीचर्स मिळणार आहेत.

दुसरीकडे कार्निव्हल लिमोझिन हायब्रिडमध्ये 1.6 लिटरचं टर्बो-पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेन असून त्याला सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडलंय. आत्तापर्यंत कार्निव्हल फक्त डिझेल पर्यायातच मिळायची, पण आता हायब्रिड पर्यायामुळे इंधन कार्यक्षमता आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारल्याचं सांगण्यात येतंय. कियाची ही फ्लॅगशिप एमपीव्ही असून यात आलिशान सीटिंग, पॉवर्ड स्लाइडिंग डोअर्स आणि प्रीमियम इंटिरियरसारखे फीचर्स आहेत.

Kia Carens CNG आणि Carens Clavis CNG च्या किमती कंपनीने अजून जाहीर केलेल्या नाहीत. सणासुदीच्या हंगामाआधी या गाड्या लॉन्च होतील अशी अपेक्षा आहे. लॉन्चची नेमकी तारीख जाहीर झाली नसली, तरी सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे.

अंदाजानुसार ही सीएनजी गाडी एका किलोग्रॅममागे 22 ते 25 किलोमीटरचं मायलेज देईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार इंजिन अशा पद्धतीने कॅलिब्रेट केलंय की परफॉर्मन्सवर काही परिणाम होणार नाही. मात्र 60 लिटरची सीएनजी टाकी बूट फ्लोअरखाली बसवल्यामुळे बूट स्पेस थोडी कमी झालीय.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ