Kemoryची भारतात एंट्री; एकाच जागी साठवा तुमचं AI नॉलेज
सिकॉडब्रेन कंपनीने भारतात Kemoryची पब्लिक बीटा आवृत्ती लाँच केली असून, कोणत्याही AI मॉडेलवर अवलंबून न राहता युजर्सना त्यांचं ज्ञान एकाच ठिकाणी जपून ठेवता येणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सध्या रोजच्या कामासाठी लोक वेगवेगळी AI टूल्स वापरतात. पण एक अडचण सतत जाणवते ती म्हणजे, नवीन टूल वापरायला घेतलं की पुन्हा तीच माहिती द्यावी लागते, आधीचे रेफरन्स परत समजावून सांगावे लागतात आणि आधी तयार केलेलं ज्ञान परत सुरुवातीपासून शेअर करावं लागतं. यामुळे युजर्स वैतागतात. हीच अडचण सोडवण्यासाठी सिकॉडब्रेन या कंपनीने भारतात Kemoryची पब्लिक बीटा आवृत्ती आणली आहे.
Kemory ही एक स्वतंत्र आणि युजरच्या परवानगीवर आधारित AI मेमरी लेयर आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही AI मॉडेल किंवा असिस्टंट वापरत असलात, तरी तुमचा संदर्भ आणि ज्ञान तुमच्याचसोबत राहतं. आजकाल युजर्स फक्त एकाच AI पुरते मर्यादित राहत नाहीत, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी टूल्स आणि असिस्टंट्स वापरणं आता कॉमन झालंय. पण प्रत्येक नवीन टूलला "मी कोण आहे", "माझं काम काय आहे" किंवा "आधी आपण काय बोललो होतो" हे परत सांगणं टाइम खाणारं ठरतं. Kemory नेमकं इथेच काम करते. ही कुठल्याही एका AI मॉडेलवर डिपेंड नसल्याने, युजर्सना त्यांचं ज्ञान एका जागी सेव्ह करून ठेवता येतं आणि गरजेप्रमाणे वेगवेगळ्या AI टूल्सना त्याचा वापर करण्याची परवानगी देता येते.
सिकॉडब्रेनचे संस्थापक आणि सीईओ सचिन देव दुग्गल यांनी सांगितलं की, "Kemoryसाठी भारत ही नंतरची बाजारपेठ नाही; भारत हाच बाजार आहे. जेव्हा वापरकर्त्यांकडे त्यांचं स्वतःचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात, तेव्हा प्रत्येक AI मॉडेलला शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. ते आधीपासून उपलब्ध असलेल्या संदर्भापासून पुढे काम करू शकतं."
सिकॉडब्रेनच्या माहितीनुसार, Kemoryचा फोकस तीन गोष्टींवर आहे - ज्ञानाची मालकी, परवानगीवर आधारित अॅक्सेस आणि AI मॉडेल्सपासून वेगळं राहण्याची क्षमता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पब्लिक लाँगमेमइव्हॅल-एस ओरॅकल बेंचमार्कवर Kemoryने 89.6 टक्के अचूकता मिळवली आहे, म्हणजे 500 पैकी 448 प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यात आली. हा स्कोअर फक्त मेमरीमधून बरोबर माहिती शोधण्याची क्षमता दाखवत नाही, तर माहिती शोधणं, उत्तर तयार करणं आणि त्या उत्तराचं मूल्यांकन करणं या पूर्ण प्रोसेसमधली कामगिरी दाखवतो.
Kemory ही "फॉर इंडिया, फ्रॉम इंडिया" या विचारातून तयार करण्यात आली आहे. कंपनीने सांगितलं आहे की भारतीय युजर्सचा डेटा भारतातील सर्व्हरवरच साठवला जातो. पब्लिक बीटा आवृत्तीत युजर्सना क्रोमसाठी कोरा, दोन कनेक्टेड AI, 2,000 पर्यंत मेमरीज आणि चॅट्स, तसंच फेअर यूज क्रेडिट्स मोफत मिळणार आहेत. Kemoryची पब्लिक बीटा आवृत्ती आता भारतातील युजर्ससाठी उपलब्ध झाली आहे.
सिकॉडब्रेन ही कंपनी AI, माणसं आणि ज्ञानाच्या टीम्ससाठी एक शेअर्ड इंटेलिजन्स लेयर तयार करत आहे. कंपनीचं न्यूरोसिम्बॉलिक मेमरी आणि रीझनिंग लेयर हे AI मॉडेल्सच्या वर आणि युजर किंवा संस्था वापरत असलेल्या एजंट्स व टूल्सच्या खाली काम करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. यामागची आयडिया सोपी आहे - प्रत्येक नव्या संभाषणात AIने पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याऐवजी, आधी तयार झालेल्या संदर्भ आणि ज्ञानाच्या आधारावर पुढे काम करावं.
Kemory ही सिकॉडब्रेनच्या भविष्यातील शेअर्ड मेमरी इन्फ्रास्ट्रक्चरमधली पहिली लेयर आहे आणि कंपनीने याची सुरुवात मेमरीपासून केली आहे. वाढत्या डेटामुळे तयार होणारी गुंतागुंत कमी करून जगभरातील विचार करणाऱ्या लोकांना त्यांचं ज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने वापरता यावं, हे कंपनीचं मोठं ध्येय आहे. सिकॉडब्रेन ही कंपनी कॉग्निटिवो नावाच्या फ्लॅट टीम स्ट्रक्चरमध्ये काम करते. यामध्ये स्पेशालिस्ट सायलोज किंवा फक्त मॅनेजमेंट रोल्सवर भर न देता, प्रत्येक मेंबरला उत्पादन बनवण्यात थेट सहभाग घेण्याची आणि आपल्या कामाची एंड-टू-एंड जबाबदारी घेण्याची संधी दिली जाते.