गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:40 IST

पोट साफ होत नाही? पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो कमी

सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आहारात पेरूचा समावेश करणे फायद्याचे ठरते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या तक्रारी कमी होतात.

पोट साफ होत नाही? पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो कमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सकाळी उठल्यावर पोट नीट साफ न झाल्यास दिवसभर काहीच करावंसं वाटत नाही आणि सगळं कंटाळवाणं वाटतं. याचं कारण म्हणजे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम करतात. यामुळे ऍसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या तक्रारी वाढून एकूण आरोग्य बिघडतं. पोट जड वाटणं, शौचाला कडक होणं, पोट पूर्ण साफ न होणं या सामान्य वाटणाऱ्या तक्रारी प्रत्यक्षात गंभीर आजाराचं कारण बनू शकतात.

आजकाल आहारात होणारे बदल, कामाचा वाढता ताण, पाणी कमी पिणं आणि वारंवार जंक फूड खाणं यामुळे पचनक्रियेवर थेट परिणाम होतो. पचनक्रिया बिघडली की खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. पोटातलं अन्न पुन्हा वर आल्यावर घशात जळजळ होणं, छातीत दुखणं किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढतो. अशा अपचनाच्या तक्रारीपासून सुटका हवी असेल तर रोज आहारात पेरूचा समावेश करावा. रोज एक पेरू खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहायला मदत होते आणि आरोग्य सुधारतं. पेरूमध्ये भरपूर पाणी, फायबर आणि नैसर्गिक घटक असतात, जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवायला मदत करतात.

बद्धकोष्ठता वाढली की अपचनाच्या तक्रारीही सतत होत राहतात. अशावेळी पेरू खाणं फायद्याचं ठरतं. पेरू खाल्ल्याने शरीराला आवश्यक तेवढं फायबर मिळतं. फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत राहते. पेरूमध्ये न विरघळणारं फायबर असतं, जे विष्ठेला योग्य आकार देतं. पोट साफ राहण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. पेरूमध्ये सॉर्बिटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं, ज्यामुळे आतड्यांमध्ये पाणी खेचलं जातं आणि विष्ठा मऊ होते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात एक पेरू खावा.

पेरू खाल्ल्याने फक्त पोट साफ होत नाही तर आतड्यांची हालचालही सुलभ राहते. यातलं फायबर आतड्यांमध्ये चांगले जिवाणू तयार करायला मदत करतं. आतड्यांचं आतलं अस्तर निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनसंस्था कायम संतुलित ठेवण्यासाठी पेरूसोबतच इतर पाणीदार फळांचाही आहारात समावेश करावा. याशिवाय भरपूर पाणी पिणं, नियमित हालचाल करणं आणि पौष्टिक पदार्थ खाणं गरजेचं आहे. फायबरयुक्त फळं आहारात असतील तर पचनसंस्था कायम निरोगी राहते.

मात्र काही लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. शौचातून रक्त पडणं, अचानक वजन कमी होणं, पोटात सतत तीव्र वेदना होणं, उलट्या होणं, ताप येणं किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवणं ही लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. कारण आतड्यांचा कॅन्सर किंवा आतड्यांमध्ये अल्सर तयार झाल्यास गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.

हा लेख फक्त सर्वसाधारण माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ