गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
11:40 IST

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर...

हरदोईत पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला आणि नंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली दिली.

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर...
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

हरदोईमध्ये गुन्हेगारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहेत. यातीलच एक धक्कादायक घटना समोर आली असून, चारित्र्यावर संशय घेऊन एका पतीने आपल्याच पत्नीचा खून केला. पत्नी गाढ झोपेत असताना पतीने चाकूने तिचा गळा चिरला. विशेष म्हणजे पत्नीचे शिर धडापासून वेगळे केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने हा गुन्हा कबूल केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना हरदोईच्या कोतवाली शहर भागातील इस्लामनगर टिलिया मोहल्ल्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. परवेज नावाच्या व्यक्तीने आपली ३० वर्षीय पत्नी नगमा हिचा खून केला. नगमाचे इतर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय परवेजला होता, आणि याच संशयातून त्याने झोपलेल्या नगमावर चाकूने वार केले. वार करताना त्याने तिचे शिर धडापासून वेगळे केले, म्हणजेच तिचा शिरच्छेद केला.

ही भीषण घटना घडवल्यानंतर रात्री उशिरा परवेजने घराचा दरवाजा बंद केला आणि तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उभे राहून त्याने, मी माझ्या पत्नीला मारून आलो आहे, अशी स्पष्ट कबुली दिली. परवेजच्या तोंडून हे शब्द ऐकताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर नगमाचा मृतदेह अतिशय विदारक अवस्थेत पडलेला त्यांना आढळला.

दुसऱ्या एका वेगळ्या घटनेत, शहरातील रामेश्वर कॉलनी भागातून काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह पद्मालयच्या जंगलात सापडला असून त्यामुळेही परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव कविता अरुण मिस्त्री असे आहे. १३ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह जंगल भागात आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी नरेश ऊर्फ आबा अनिल सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.

यासोबतच आणखी एक प्रकरण समोर आले असून, यात एका २५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आश्वासन देऊन अडीच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नीला घटस्फोट देऊन त्या तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगत आरोपीने तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. तक्रारीनुसार, तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तिला मारहाण करत लग्नास स्पष्ट नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून सलून व्यावसायिक वनेश्वर फकीरराव पंडित (रा. पिसादेवी) याच्याविरुद्ध सिडको पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ