गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:41 IST

गौरी आगमन २०२६: फुलं, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करा मखराची सुंदर सजावट

गौरी आगमनाच्या निमित्ताने घरातच सहज उपलब्ध वस्तूंमधून पारंपरिक आणि आकर्षक मखर कसं सजवायचं, याच्या काही सोप्या आयडिया.

दरवर्षी गौराई तीन दिवसांसाठी माहेरी येते. या तीन दिवसांत गौरी आवाहन, गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी गणपती विसर्जन असा क्रम असतो. यंदा गौरी आवाहन गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी आहे आणि त्यादिवशी आवाहनासाठी मुहूर्त संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल. शुक्रवारी दिवसभरात कधीही गौरीची पूजा करता येईल. गौरी विसर्जनासाठी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २७ मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंतचा वेळ आहे.

गौरी आगमनाच्या दिवशी मखराच्या सजावटीला खूप महत्त्व दिलं जातं, पण त्यासाठी महागड्या वस्तू विकत घ्यायची गरज नाही. घरात सहज मिळणाऱ्या फुलं, कागद आणि दिव्यांचा वापर करूनही सुंदर आणि पारंपरिक मखर तयार करता येतं.

फुलांनी मखर सजवायचं असेल तर झेंडू, गुलाब आणि मोगरा वापरता येतो. फुलांचं तोरण किंवा माळा मखराच्या चौकटीला लावल्यास सजावट अजून खुलून दिसते. यासोबतच आंब्याच्या पानांचं पारंपरिक तोरणही मखराला लावता येतं. फुलांबरोबर हिरव्या पानांची सजावट केल्यास मखराला एक वेगळाच पारंपरिक लूक मिळतो.

पैसे कमी खर्च करायचे असतील तर रंगीत कागद, क्राफ्ट पेपर किंवा कार्डशीटपासून फुलं, पानं आणि वेगवेगळे आकार बनवूनही मखर सजवता येतं. घरात असलेली सुंदर साडी, दुपट्टा किंवा पारंपरिक कापडही मखराच्या मागे लावता येतं. पैठणी किंवा रेशमी कापड वापरल्यास मखराला पारंपरिक आणि उठावदार रूप मिळतं.

मखराच्या आजूबाजूला छोट्या पणत्या किंवा एलईडी दिव्यांची माळ लावली की प्रकाशामुळे संपूर्ण सजावट अधिक खुलून दिसते. मात्र दिवे लावताना सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. मखरासमोर किंवा आजूबाजूला पारंपरिक रांगोळी काढल्यासही सजावट आकर्षक दिसते, त्यासाठी फुलांची रांगोळीही चांगला पर्याय ठरू शकते.

संपूर्ण सजावटीसाठी एखादी थीम ठरवल्यास मखर अधिक नीटनेटकं दिसतं. फुलांची थीम, पारंपरिक महाराष्ट्राची थीम किंवा नैसर्गिक सजावट यापैकी कोणतीही कल्पना निवडता येते. मखरासाठी थर्माकोल किंवा महागड्या वस्तूंऐवजी कार्डबोर्ड, कागद, जुनं कापड, फुलं आणि घरातील उपलब्ध वस्तूंचा पुनर्वापर करणंही शक्य आहे.

मखराची सजावट करताना खर्चापेक्षा कल्पकता आणि स्वच्छता जास्त महत्त्वाची असते. साध्या साहित्याचा नीट वापर केला तरी घरच्या घरी आकर्षक, पारंपरिक आणि मनमोहक मखर तयार करता येतं. सजावट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे गौरीच्या मूर्तीपेक्षा सजावट जास्त उठून दिसणार नाही याची काळजी घेणं. मखर स्वच्छ, सुरक्षित आणि पूजेसाठी सोयीचं असावं. फुलं आणि पानं वापरत असाल तर ती ताजी ठेवण्याचाही प्रयत्न करावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ