गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:42 IST

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर

गणेशोत्सवाच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची आवक अचानक वाढल्याने कल्याण एपीएमसीत भाव कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल या आशेने महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यांतील शेतकरी कल्याण एपीएमसीच्या फुल बाजारात फुले घेऊन दाखल झाले होते. गणेशोत्सव जवळ आला की झेंडूच्या फुलांना मागणी वाढते आणि त्यामुळे भावही चांगला मिळतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव असतो. याच अपेक्षेने यंदाही अनेक शेतकऱ्यांनी आपली फुले विक्रीसाठी बाजारात आणली होती. पण बाजारात फुलांची आवक अचानक खूप वाढल्यामुळे झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.

काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलोने विकला जाणारा झेंडू आता अवघ्या १० ते ३० रुपये किलो दराने विकावा लागत आहे. इतक्या कमी दरात फुले विकून शेतकऱ्यांना बाजारापर्यंत फुले आणण्यासाठी लागणारा गाडीभाडे खर्चही निघत नाहीये. गणेशोत्सव तोंडावर असतानाच भाव असे कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वर्षभर मेहनत करून पिकवलेली फुले अशा कमी दरात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, फुले विकून जेवढे पैसे मिळतात, त्यातून गाडीभाडे आणि इतर खर्चही भागत नाहीत. म्हणजेच फुले बाजारापर्यंत आणण्यासाठी जो खर्च होतो, तेवढेही पैसे विक्रीतून परत मिळत नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर तर आपली फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली आहे.

कल्याण एपीएमसीच्या बैल बाजारातील फुल बाजारात सध्या झेंडूचे भाव २० ते ४० रुपये किलोपर्यंत असल्याचं एका फूल विक्रेत्याने सांगितलं. बाजारात फुलांची आवक भरपूर असताना गिऱ्हाईकांची संख्या मात्र कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फुलांच्या विक्रीतून गाडीभाडं काढणंही जड जात आहे. गणेशोत्सवासाठी वर्षभर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळेल असं वाटत होतं, पण गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच दर कोसळल्यामुळे त्यांची निराशा झाली. फुलांच्या विक्रीतून उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

एका फूल व्यापाऱ्याने सांगितलं की, यंदा पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली होती. मागच्या वर्षी नुकसान झालं होतं, त्यामुळे यंदा कमी भांडवलात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पण उत्पादन वाढल्यामुळे बाजारात फुलांची आवक प्रचंड वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरावर झाला. फुले ही नाशवंत असल्याने एक-दोन दिवसांतच विकावी लागतात, ती जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहीत. बाजारात गिऱ्हाईक कमी आणि आवक जास्त असल्याने फुले विकणंही अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळेच काही शेतकऱ्यांना आपली फुले फेकून द्यावी लागत असल्याचं व्यापाऱ्याने सांगितलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ