गणेशोत्सवासाठी हटके फोटो हवेत? हे 10 AI प्रॉम्प्ट वापरून बघा
बाप्पाच्या स्वागतासाठी तेच जुने फॉरवर्ड केलेले फोटो पाठवून कंटाळला असाल, तर हे AI प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करून स्वतःचा भारी फोटो बनवता येईल.
गणेशोत्सव जवळ आला की सगळेजण व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एकमेकांना शुभेच्छा पाठवतात. पण दरवर्षी तेच तेच फॉरवर्ड केलेले फोटो पाठवून कंटाळा येत असेल, तर यंदा वेगळं काहीतरी करता येईल. यासाठी फोटोशॉप येण्याची गरज नाही. फक्त खाली दिलेले प्रॉम्प्ट कॉपी करायचे आणि Bing Image Creator सारख्या फ्री टूलमध्ये पेस्ट करायचे. काही सेकंदात स्वतःच्या नावाचा, एकदम भारी 3D फोटो तयार होतो. सध्या बरेच जण आपल्या नावाचे असे 3D फोटो बनवून पोस्ट करत आहेत.
पहिला प्रॉम्प्ट स्टेटससाठी बेस्ट आहे. यात एका 22 वर्षांच्या भारतीय मुलाचा किंवा मुलीचा पारंपरिक पोशाखातला (कुर्ता किंवा साडी) 3D फोटो तयार होतो, जो सजवलेल्या इको-फ्रेंडली गणपतीसमोर बसलेला दाखवला जातो. मागच्या भिंतीवर सोनेरी अक्षरात Happy Ganeshotsav आणि स्वतःचं नाव लिहून येतं. मुलगा असाल तर boy आणि कुर्ता, मुलगी असाल तर girl आणि साडी असं प्रॉम्प्टमध्ये लिहायचं. दुसरा प्रॉम्प्ट मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीसारखा ढोल-ताशाचा एनर्जेटिक फोटो तयार करतो, ज्यात तरुण मंडळी ढोल-ताशा वाजवताना, मराठा झेंडे फडकताना आणि हवेत गुलाल उडताना दिसतो.
तिसरा प्रॉम्प्ट लहान मुलांसाठी आहे. यात पिक्सार स्टाइलमध्ये एक लहान मुलगा छोट्या बाल-गणेशाला मिठी मारताना दिसतो, मागे मोदक आणि फुलांची सजावट असते. चौथ्या प्रॉम्प्टमध्ये घराच्या दारातली रांगोळी, झेंडूची फुलं, आंब्याची पानं आणि दिवे लावलेला पारंपरिक देखावा तयार होतो, मध्यभागी छोटी गणेशमूर्ती असते. पाचवा प्रॉम्प्ट इन्स्टाग्रामसाठी मॉडर्न लूक देतो, यात गणपतीभोवती केशरी, निळ्या आणि सोनेरी रंगाचे निऑन आउटलाइन दाखवले जातात.
फोटोसोबत कॅप्शन आणि शुभेच्छाही हव्या असतील, तर ChatGPT किंवा Gemini मध्ये पुढचे प्रॉम्प्ट वापरता येतात. सहावा प्रॉम्प्ट घरातल्या मोठ्यांसाठी भावूक मराठी शुभेच्छा तयार करतो, सातवा मित्रांसाठी ट्रेंडी इन्स्टाग्राम कॅप्शन देतो. आठवा प्रॉम्प्ट ऑफिसमधल्या क्लायंट, सहकारी किंवा बॉससाठी फॉर्मल इंग्रजी मेसेज तयार करतो. नववा प्रॉम्प्ट गणपतीच्या विघ्नहर्ता रूपावर आधारित आध्यात्मिक सुविचार देतो, तर दहावा प्रॉम्प्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यासाठी चार ओळींची चारोळी तयार करतो.
हे सगळं बनवण्यासाठी गुगलवर Bing Image Creator किंवा Microsoft Copilot सर्च करायचं, हे दोन्ही फ्री आहेत. तिथे वरचे प्रॉम्प्ट पेस्ट केले की फोटो तयार होतो. मेसेज किंवा कविता बनवायची असेल, तर ChatGPT किंवा Gemini वापरता येतं. यंदा तेच फॉरवर्डेड मेसेज पाठवण्याऐवजी स्वतःच्या नावाचा AI फोटो बनवला, तर स्टेटस आणि इन्स्टा पोस्ट वेगळी दिसेल.